home page top 1

PM मोदींच्या पुतणीला दिल्लीच्या ‘पॉश’ परिसरात लुटणाऱ्यांचा ‘फोटो’ जारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुतणीला दिल्लीतील सिविल लाईन परिसरातील काही अन्यात चोरांनी लुटले होते. पोलिसांनी याबाबतचा अधिक तपास देखील सुरु केला होता. याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे.

दिल्ली पोलीस प्रवक्ता अनिल मित्तल यांनी सांगितले की ही घटना गुजराती समाज भवनच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. त्याचप्रमाणे पोलिसांना आरोपीचे पक्के धागेदोरे मिळाले आहेत त्यासंबंधीचा अधिक तपास सुरु आहे आणि आरोपींनी वापरलेल्या स्कुटीवरून सुद्धा त्यांचा शोध घेणे सुरु आहे.

अशा प्रकारे झाली होती चोरी
पंतप्रधान मोदी यांची पुतणी दमयंती बेन यांच्या हातातील पर्स काही अन्यात चोरट्यांनी सिविल लाईन येथील गुजरात समाज भवनच्या जवळुन हिसकावून नेली होती. जो पर्यंत ही बाब दमयंती यांच्या लक्षात येते तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार दमयंती यांच्या पर्समध्ये 56 हजार रुपये आणि काही महत्वाची कागदपत्रे होती.

दिल्लीचा सिविल लाईन हा परिसर व्हीआयपी परिसर आहे कारण याच परिसरात दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा बांगला आहे तसेच घटनास्थळाच्या जवळच दिल्लीचे लेफ्टनंट गवर्नर यांचे घर आहे. असे असूनही भर दिवस घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते.

घटनेला राजकीय वळण
या घटनेमुळे आता राजकीय वातावरण सुद्धा तापू लागले आहे. या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी म्हणाले की राजधानीत लूटमार आणि स्नॅचिंगच्या घटना सातत्याने घडत आहेत आणि त्यासाठी 90 % अवैध घुसखोर जबाबदार आहेत असे आम्ही सातत्याने सांगत आलो आहोत. दिल्लीचे मुख्यमंत्री घुसखोरांना दिल्ली बाहेर हाकलून देण्याच्या घोषणा करत होते मात्र असे बोलून मुख्यमंत्री अशा घुसखोरांना संरक्षण देण्याचे काम करत आहेत असे परखड मत तिवारी यांनी व्यक्त केले.

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like