भाजपला धक्का : मोदींचा कट्टर विरोधक काँग्रेस सोडणार नाही

अहमदाबाद : गुजरात वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय युद्ध रंगायला आता सुरुवात झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीची व्यूहरचना म्हणून भाजपने गुजरातमध्ये दुसऱ्या पक्षाचे नेते आयात करण्यावर भर दिला आहे. काँग्रेसची साथ सोडून ओबीसी नेते अल्पेश ठाकूर भाजपमध्ये जाणार या चर्चाना आता त्यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन पूर्णविराम दिला आहे. आपण भाजपमध्ये जाणार आणि भाजप आपल्याला मंत्रीपद देणार या सर्व अफवा आहेत असे अल्पेश ठाकूर यांनी म्हणले आहे.

सत्ता कोणाला नको वाटते आणि मंत्री व्हायला कोणाला आवडणार नाही. पण मी ज्या वर्गाचे प्रतिनिधित्व करतो , त्या वर्गाचे अनेक प्रश्न आहेत . जे मला सोडवायचे आहेत. मला जर फक्त मंत्री व्हायचे असते , तर मी मागील सहा महिन्यापूर्वीच भाजपमध्ये गेलो असतो . आणि मंत्री झालो असतो ,असे अल्पेश ठाकूर म्हणाले आहेत. मी राजकारणात यायचे म्हणून आलो नाही. मी लोकांची सेवा करायला राजकारणात आलो आहे. माझी पत्नी किंवा कोणीच राजकारणात नाही. तसेच या ज्या अफवा उठल्या आहेत त्यामुळे मी दुखी झालो आहे असे अल्पेश ठाकूर यांनी म्हणले आहे.

मी काँग्रेसच्या बाजूने मते मागीतली आहेत. त्यामुळे मी काँग्रेसला दगा देणार नाही. तसेच आपण काँग्रेसची साथ सोडणार नसल्याने  काँग्रेसला धक्का देण्याच्या भाजप नेत्यांच्या कटावर पाणी फेरले आहे. असे अल्पेश ठाकूर यांनी म्हणले आहे. अल्पेश ठाकूर हे काँग्रेस सोबत असल्याने गुजरात काँग्रेसमध्ये चैतन्य पसरले आहे. तसेच अल्पेश ठाकूर यांना काँग्रेसची बी टीम हि म्हणले जाते.


हे हि वाचा ; 

राज्यातील ७ पोलीस उप अधीक्षक / सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्या

हळद लागण्यापूर्वीच भावी वधूचा दुर्दैवी मृत्यू

‘टेलीग्राफचे पत्रकार नीरव मोदीला शोधू शकतात , परंतु चौकीदार नाही’…!

राज्यातील २ उप अधिक्षक / सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या

”पुन्हा भाजपची सत्ता येईल, पण पंतप्रधान मोदीच होतील का शंकाच”