Video : ‘आता फक्त नोटांवर गांधीजींच्या जागी मोदी यायचे बाकी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पश्चिम बंगलासह 5 राज्यांमध्ये निवडणुकीचं वातावरण आहे. प. बंगालमध्ये भाजप (Bharatiya Janata Party – BJP) विरुद्ध टीएमसी (All India Trinamool Congress – TMC) असा जोरदार मुकाबला दिसत आहे. बंगालमध्ये कोरोना लसीकरण (COVID-19 Vaccinations) देखील सुरू आहे. परंतु लसीकरण प्रमाणपत्रामुळं आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. प्रमाणपत्रावर असणाऱ्या पीएम नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या फोटोवर टीएमसीनं आक्षेप घेतला होता आणि केंद्रावर टीका केली होती. या मुद्द्यावर आता राष्ट्रवादीनं मोदींना चिमटा काढला आहे.
‘नरेंद्र मोदी फोटो छापण्याच्या स्पर्धेत खूपच पुढं निघून गेलेत’
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी मोदींवर टीका केली आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी यावर भाष्य केलं आहे. मलिक म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी फोटो छापण्याच्या स्पर्धेत खूपच पुढं निघून गेले आहेत. जिकडे पहावं तिकडं मोदींचेच फोटो दिसतात असा टोला मलिक यांनी लगावला आहे.
प्रधानमंत्री मोदी जी तस्वीर छपाने की दौड में इतने आगे निकल गए है की सारे पेट्रोल पंप में, रेल्वे स्थानकों, एअरपोर्ट पर मोदी जी की तस्वीर है जहाँ देखे मोदी जी की तस्वीर नजर आती है।
(१/२) pic.twitter.com/aGNYBkYzUk
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) March 6, 2021
‘…तर मोदीजी नोटेवरून महात्मा गांधींचा फोटो हटवून स्वत:चा फोटो छापतील’
पुढं बोलताना ते म्हणतात, खादीच्या कॅलेंडरवर महात्मा गांधींच्या फोटोच्या जागी स्वत:चा फोटो छापला. आता लसीकरण प्रमाणपत्रावरही मोदींनी स्वत:चा फोटो लावला आहे. हे असंच चालत राहिलं तर मोदीजी नोटेवरून महात्मा गांधींचा फोटो हटवून स्वत:चा फोटो छापतील असं म्हणत त्यांनी मोदींवर जोरदार टीका केली आहे.
मलिक यांचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.