PM Modi | ‘नवीन शिक्षण धोरण कोणत्याही दबावापासून मुक्त, विद्यार्थी काय शिकणारे हे फक्त संस्था ठरवू शकत नाही’ – पीएम मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra modi) यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण (National Education Policy) 2020 च्या अंतर्गत सुधारणांना एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने PM Modi म्हटले की, शिक्षण धोरणाला प्रत्येक प्रकारच्या दबावापासून मुक्त ठेवले गेले आहे. जे खुलेपणाच्या धोरणाच्या स्तरावर आहे, तसेच खुलेपणा विद्यार्थ्यांना मिळणार्‍या पर्यायांमध्ये सुद्धा आहे. आता विद्यार्थ्यांनी किती शिकावे, किती कालावधीपर्यंत शिकावे, हे केवळ संस्था ठरवणार नाहीत. त्यांनी हे सुद्धा म्हटले की, 14 इंजिनियरिंग कॉलेजांमध्ये हिंदीसह 5 भारतीय भाषांमध्ये इंजिनियरिंगचा अभ्यास सुरू करत आहोत.

पीएम मोदी यांनी संबोधनाची सुरुवात करताना म्हटले की, नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाला एक वर्ष पूर्ण झाल्याने सर्व देशवासी आणि सर्व विद्यार्थ्यांना खुप-खुप शुभेच्छा.
तत्पूर्वी त्यांनी शिक्षण क्षेत्राशी संबंधीत अनेक उपक्रमांची सुद्धा सुरूवात केली.
मागील एक वर्षात देशातील सर्व तज्ज्ञ, शिक्षक, प्राचार्य, धोरणकर्त्यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरणाला प्रत्यक्ष आणण्यासाठी खुप मेहनत घेतली.

त्यांनी म्हटले की, हा महत्वाचा क्षण अशावेळी आला आहे, जेव्हा देश स्वातंत्र्याची 75 वर्ष म्हणजे अमृत महोत्सव साजरा करत आहे.
अशावेळी नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे इम्प्लीमेटेशन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा प्रमुख भाग बनले आहे.

पीएम मोदी म्हणाले, शिक्षणात आपण भविष्यात किती पुढे जाऊ हे आज आपण आपल्या तरूणांना कोणते शिक्षण देत आहोत यावर ठरणार आहे.
भारताचे नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण राष्ट्र निर्मितीच्या महायज्ञात मोठ्या फॅक्टर्सपैकी एक आहे.

तरूणांना पिंजर्‍यातून सुटका हवी आहे : पीएम मोदी

तरूणांचे कौतूक करत मोदी म्हणाले, 21च्या शतकातील तरूणांना आपली व्यवस्था, आपले जग आपल्या हिशेबाने बनवायचे आहे.
यासाठी, त्यांना एक्सपोजर हवे, त्यांना जुनी बंधने आणि पिंजर्‍यातून मुक्ती हवी आहे.

 

 

काय म्हणाले पीएम मोदी…

राष्ट्रीय शिक्षण धोरण विश्वास देते की आता संपूर्ण देश त्यांच्या सोबत आहे.

आर्टिफिशियल इंटेलीजन्स प्रोग्राम लाँच केला आहे.

चांगल्या शिक्षणांसाठी परदेशात जावे लागत होते.
आता चांगल्या शिक्षणासाठी परदेशातून विद्यार्थी कसे येतील हे आपल्याला पहायचे आहे.

आपल्या तरूणांना जगाच्या एक पाऊल पुढे राहावे लागेल.
प्रत्येक क्षेत्रात आत्मनिर्भर व्हावे लागेल.

8 राज्यांच्या 14 इंजिनियरिंग कॉलेजमध्ये, 5 भारतीय भाषा -हिंदी-तमिळ, तेलगू, मराठी आणि बांगलामध्ये इंजिनियरिंगचे शिक्षण सुरू करत आहोत.

अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटचा शुभारंभ मोदींनी केला.
जी उच्च शिक्षणात विद्यार्थ्यांना अनेक पर्याय देईल.

 

Web Title : PM Modi | pm narendra modi to address the education community in the country today launch multiple key initiatives to mark first anniversary of national education policy

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

PMRDA विकास आराखड्याचे प्रारूप मान्य, नागरिकांच्या सुचना व हरकती मागविणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

IT Company | दिग्गज IT कंपनी देईल 1 लाख लोकांना नोकरी, उत्पन्नात झाली 41.8 टक्केची वाढ

Pune Crime | रेल्वे प्रवाशांच्या वस्तू चोरणार्‍यास सक्तमजुरीची शिक्षा; चोरीच्या 11 गुन्ह्यात झाला कारावास