PM Modi | सर्व पक्षांच्या प्रमुखांना PM नरेंद्र मोदी देणार कोरोनासंबंधीची सविस्तर माहिती; पंतप्रधानांची ग्वाही

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) हे उद्या सायंकाळी सर्व पक्षांच्या प्रमुखांना कोरोना संबंधीची सर्व तपशीलवार माहिती देणार आहेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या प्रारंभी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी ही माहिती दिली.

कोरोना महामारीच्या साथीच्या विषयावर प्राधान्याने चर्चा करण्यास सरकार तयार असून खासदारांकडून आम्हाला विधायक सूचना मिळाल्या पाहिजेत, जेणे करुन कोविडविरुद्ध लढा देण्यासाठी एक नवीन दृष्टिकोन येईल आणि उणीवा दूर व्हाव्यात. त्यातून प्रत्येक जण एकत्रित लढाईत पुढे जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी सांगितले.

संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु झाले आहे. संसदेमध्ये प्रवेश करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्रकारांना संबोधित करीत होते. संसदेचे कामकाज सुरु होताच विरोधकांनी पंतप्रधान मोदी यांचे भाषण सुरु असताना गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तशा परिस्थितीत त्यांनी आपले भाषण केले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, मी सर्व पक्षांच्या नेत्यांना आवाहन केले आहे की, त्यांनी उद्या सायंकाळी थोडा वेळ काढला तर मी त्यांना साथीच्या आजारासंबंधी सर्व तपशीलवार माहिती देऊ इच्छित आहे. आम्हाला संसदेच्या आत तसेच संसदेच्या बाहेरही सर्व पक्षांच्या नेत्यांसमवेत चर्चा करायची आहे. पंतप्रधान मोदी यांनी सर्व खासदार व सर्व पक्षांना सभागृहात कठीण प्रश्न विचारावेत, असे आवाहन केले. त्यामुळे लोकशाहीला चालना मिळेल. लोकांचा विश्वास बळकट होईल आणि विकासाची गती सुधारेल.

हे देखील वाचा

Pegasus द्वारे हेरगिरी करतंय सरकार, समोर आलेल्या पहिल्या यादीत 40 भारतीय पत्रकार; भीमा कोरेगाव-एल्गार परिषदप्रकरणात सुद्धा वापर

Police Suspended | पोलिसांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू, पोलिस उपनिरीक्षकासह सह तिघे पोलीस कर्मचारी निलंबित

Meditation | तज्ञांनी सांगितला मेडिटेशन करण्याची सर्वात सोपी पध्दत, आता प्रत्येक जण करू शकतो ‘ध्यान’ साधना; जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  PM Modi | PM Narendra Modi will give detailed information about Corona to all party leaders; Testimony of the Prime Minister

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update