PM Modi Portrait Removed | सरकारी कार्यालयातून जबरदस्तीने हटवले पीएम मोदींचे छायाचित्र, उडाला एकच गोंधळ; पहा Video

चेन्नई : वृत्तसंस्था – PM Modi Portrait Removed | तामिळनाडूच्या तंजावर जिल्ह्यातील एका सरकारी कार्यालयातून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांचे छायाचित्र (PM Modi Photo) जबरदस्तीने हटवण्यात आले आहे. यासंबंधीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. पंचायत कार्यालयातून (Panchayat Office) पंतप्रधान मोदींचा फोटो हटवण्यावर भाजप नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. (PM Modi Portrait Removed)

 

नगर पंचायत अध्यक्षांच्या पतीने हटवला फोटो
वृत्तानुसार, तंजाबूर जिल्ह्याच्या वेप्पथूर नगर पंचायत (Veppathur Nagar Panchayat President of Thanjabur district) अध्यक्षांनी पंचायत कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (PM Narendra Modi) फोटो लावला होता. मात्र कार्यालयात पीएम मोदींचा फोटो असल्याचे समजताच नगर पंचायत अध्यक्षांच्या पतीने कार्यालयात येऊन मोठा गोंधळ घातला आणि पीएम मोदींचा फोटो काढून टाकला.

 

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
राज्यातील भाजप आयटी सेलचे अध्यक्ष निर्मल कुमार यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. निर्मल कुमार यांनी लिहिले आहे की, तंजावर जिल्हा, वेप्पथूर नगर पंचायत अध्यक्षांना त्यांचे पती मथ्यालगन यांनी सरकारी कार्यालयातून पीएम मोदींचा फोटो काढून टाकण्यास भाग पाडले. मध्यवर्ती कार्यालयात कार्यरत असलेल्या या मथियालगन यांनी पालिका सचिवांनाही पंतप्रधानांचे चित्र सरकारी कार्यालयात लावू नका, असा इशारा दिला होता.

 

वाद वाढल्याने तो फोटो पुन्हा लावला
मात्र, वाद वाढल्यानंतर पुन्हा पंचायत कार्यालयाच्या भिंतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चित्र लावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या संपूर्ण वादावर राज्य सरकारकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही. या व्हिडिओवरून सोशल मीडियावरही राजकारण सुरू झाले आहे.

 

Web Title :- PM Modi Portrait Removed | pm modi portrait removed from panchayat office in tamilnadu panchayat office

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा