अभिनेता आमिर खानच्या ‘या’ कामावर नरेंद्र मोदी खुश ! सोशल मिडीयावर केली ‘वाह-वाह’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार आमिर खान समाजातील अनेक मुद्द्यांवर नेहमीच आपले मत मांडतो असतो. सध्या देशातील अनेक ठिकाणाहून पाण्याच्या कमतरतेच्या बातम्या समोर येत आहेत. पाण्याच्या वाढत्या कमतरतेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जल शक्ती अभियानाची सुरुवात केली. या अभियानाचं सामान्यांसोबतच खास लोकांनीही कौतुक केलं आहे. नुकतंच आमिर खानने मोदींचं कौतुक करत एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या ही पोस्ट चर्चेत आहे.

आमिर खानने ट्विट करत म्हटले आहे की, “पाण्याला मूळ आणि प्राथमिक मुद्दा बनवण्यासाठी तुम्ही टाकलेलं पाऊल खूप महत्त्वपूर्ण आहे. आमचं तुम्हाला पूर्णपणे समर्थन आहे.” आमिर खानच्या या पोस्टला मोदींनीही उत्तर दिले आहे. आमिरचे कौतुक करत मोदी म्हणतात की, “पाणी वाचवण्यासाठी आणि लोकांना यासाठी जागरुक करण्यासाठी आमिर खानचा हा मुद्दा एकदम बरोबर आहे.”

नरेंद्र मोदींनी ३० जून रोजी मन की बातमध्ये देशातील वाढत्या जल संकटाचा मुद्दा मांडला. मोदी म्हणाले की, “आपण पावसाच्या एकूण पाण्यापैकी केवळ ८ टक्के पाणी साठवू शकतो. जर जलसाठ्याची क्षमता वाढवली तर, यामुळे जल संकटाला आळा बसू शकतो.” यावेळी मोदींनी स्वच्छता अभियानाप्रमाणेच लोकांना पाणी वाचवण्यासाठीही अभियान करण्यासाठी आवाहन केले आहे. मोदींच्या या जल शक्ती संरक्षणाचे कौतुक होताना दिसत आहे.

जल संकटाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने आधीच जल शक्ती मंत्रालय स्थापित करत या मुद्याला आपल्या प्रायोरिटीमध्ये समाविष्ट केलं आहे. केंद्र सरकारने २०२४ पर्यंत देशातील सर्वच घरांमध्ये ‘नल से जल'(नळातून पाणी) पोहोचण्याचे ध्येय ठेवले आहे. दिल्लीत जल संकट एक गंभीर मुद्दा आहे. दिल्ली जल बोर्डाद्वारे केवळ ८१ टक्के लोकांपर्यंतच पाणी पोहोचवलं जात आहे. १९ टक्के लोक अद्यापही पाण्यापसून वंचितच आहेत.

 

‘झटपट मेकअप’ करण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स

किडनी आणि ह्रदय विकारावर द्राक्ष आहेत गुणकारी

वापरायच्या आधी समजून घ्या ‘डे’ आणि ‘नाईट’ क्रीम मधील फरक

दलित तरुणावर प्रेम करणाऱ्या आदिवासी युवतीला अमानुष मारहाण

जमीन नावावर होत नाही, महिलेची मुख्यमंत्र्यांकडे इच्छा मरणाची मागणी

 

Loading...
You might also like