PM Modi | पीएम मोदींची फ्रंटलाइन वर्कर्संना मोठी भेट ! सुरू केले 6 क्रॅश कोर्स, रोजगाराची नवीन संधी मिळणार, जाणून घ्या

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी शुक्रवारी 26 राज्यांच्या 111 ट्रेनिंग सेंटरकडून कोविड-19 हेल्थकेयर फ्रंटलाइन वर्कर्ससाठी विशेष प्रकारे तयार केलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ केला. या प्रोग्रामच्या अंतर्गत देशभरातील एक लाख फ्रंटलाईन वर्कर्सला कौशल्य शिकवले जाईल आणि नवीन गोष्टी शिकवल्या जातील. बुधवारी पंतप्रधान कार्यालयाकडून याबाबत माहिती देण्यात आली होती.

एक लाख कोरोना योद्धे तयार केले जाणार

या कार्यक्रमांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला म्हटले की, प्रत्येक सावधगिरीसह, येणार्‍या आव्हानांचा सामना करण्यासाठी आपल्याला देशाची तयारी आणखी वाढवायची आहे.
याच लक्ष्यासह आज देशात सुमारे एक लाख फ्रंट लाईन कोरोना वॉरियर्स तयार करण्याचे महाअभियान सुरु होत आहे.
पीएम मोदी यांनी म्हटले की, हा कोर्स दोन ते तीन महिन्यात पूर्ण होईल, यासाठी लोक ताबडतोब कामासाठी उपलब्ध सुद्धा होतील.

या अभियानांतर्गत फ्रंटलाइन वर्कर्सला मिळतील अनेक लाभ

पीएम मोदींनी पुढे म्हटले, फ्रंटलाईन वर्कर्सच्या विशेष प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत,
उमेदवारांना निःशुल्क ट्रेनिंग, स्किल इंडियाचे सर्टिफिकेट, जेवण आणि राहण्याची सुविधा,
कामावर प्रशिक्षणासह स्टायपेंड आणि प्रमाणित उमेदवारांला दोन लाख रुपयांचा दुर्घटना विमा प्राप्त होईल.

रोजगाराची सुद्धा मिळेल संधी

पीएम मोदी यांनी पुढे म्हटले की, कोविड-19 हेल्थकेयर फ्रंटलाईन वर्कर्सचा विशेष प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर उमेदवार डीएससी/एसएसडीएमच्या व्यवस्थेच्या अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, सार्वजनिक आरोग्य केंद्र, आरोग्य सुविधा आणि हॉस्पिटलमध्ये काम करू शकतील.

273 कोटी रुपयांची तरतूद

पीएम मोदी यांनी सांगितले की, कोविड-19 हेल्थकेयर फ्रंटलाईन वर्कर्सच्या विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाला PMKVY 3.0 च्या केंद्रीय घटकांतर्गत एक विशेष प्रशिक्षण कार्यक्रम म्हणून डिझाईन केले आहे आणि यासाठी 273 कोटी रुपयांच्या रक्कमेची तरतूद केली आहे.

लसीकरणात आशा कार्यकर्त्यांची महत्वाची भूमिका

याशिवाय पीएम मोदी यांनी म्हटले, गावांमध्ये संसर्गाचा प्रसार रोखण्यात दुर्गम, डोंगराळ आणि जनजाती विभागात लसीकरण अभियान यशस्वीपणे चालवण्यात आपल्या आशा, एएनएम, आंगणवाडी आणि गावात तैनात आरोग्य कर्मचार्‍यांनी खुप मोठी भूमिका बजावली आहे.

तरूणांना मिळणार रोजगाराची संधी – पीएम मोदी

पंतप्रधान मोदी यांनी म्हटले, कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत आपण पाहिले की, हा व्हायरस कशाप्रकारे रूप वारंवार बदलून आव्हाने आपल्या समोर आणू शकतो.
हा व्हायरस आपल्यात अजूनही आहे आणि तो म्यूटेड होण्याची शक्यता सुद्धा कायम आहे.
या अभियानातून कोविडशी लढणार्‍या आपल्या हेल्थ सेक्टरच्या फ्रंटलाइन फोर्सला नवीन उर्जा सुद्धा मिळेल आणि आपल्या तरूणांसाठी रोजगाराची नवी संधी मिळेल.

क्षमतांचा विस्तार करणे आवश्यक – पीएम मोदी

पीएम मोदी म्हणाले, या महामारीने जगातील प्रत्येक देश, प्रत्येक संस्था, प्रत्येक समाज, प्रत्येक कुटुंब, प्रत्येक मुनष्याच्या सामर्थ्याला वारंवार आव्हान दिले.
तसेच या महामारीने सायन्स, सरकार, समाज, संस्था आणि व्यक्तीच्या रूपात आपल्या आपल्या क्षमतांचा विस्तार करण्यासाठी सतर्क सुद्धा केले आहे.

हे देखील वाचा

 

CET | अभियांत्रिकी प्रवेशासाठी CET घेणार नाही, 10 वीच्या गुणांवर प्रवेश; उदय सामंत यांची मोठी घोषणा

 

EPFO | नोकरदारांनी लक्ष द्यावे | EPF नियमांमध्ये झाले ‘हे’ 5 मोठे बदल, जाणून घेतल्यास होईल फायदा

 

Anil Parab | परिवहन मंत्री अनिल परब यांचे स्पष्टीकरण, म्हणाले – ‘ST महाराष्ट्राची ओळख, तिचे खासगीकरण नाही’

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  PM Modi | prime minister likely to launch special programme as crash course for front line workers today

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update