हा तर ‘पायलट’ प्रोजेक्ट, रिअल काम अभिनंदन यांच्या सुटकेनंतर : मोदींचं सूचक वक्तव्य 

नवी दिल्‍ली : वृत्तसंस्था – हा तर ‘पायलट’ प्रोजेक्ट, रिअल काम नंतर असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पाकिस्तानच्या ताब्यात असणारे हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांची मुक्तता करण्याची पाकिस्तानने घोषणा केली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संसदेत अभिनंदन यांना सोडण्याची घोषणा केली. संसदेत बोलताना त्यांनी शांततेसाठी आपण भारतीय विंग कमांडरची सुटका करत असल्याचे सांगितले. परंतु पाकिस्तानच्या या घोषणेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला सूचक इशारा दिला आहे. ही तर प्रॅक्टीस होती, परंतु खरं काम तर आणखी बाकी आहे . असे त्यांनी म्हटले आहे. विज्ञान भवनातील एका कार्यक्रमात मोदी बोलत असताना हे वक्तव्य केलं.

विज्ञान भवनातील एका कार्यक्रमात मोदी बोलत होते. यावेळी बोलताना, अभिनंदन यांच्या सुटकेची बातमी येताच मोदींनी अनोख्या पद्धतीने भाषणाची सुरुवात केली. हा तर ‘पायलट’ प्रोजेक्ट, रिअल काम नंतर असंही त्यांनी आपल्या भाषणावेळी म्हटलं आहे.

नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला सूचक इशारा देताना म्हटले आहे की, “भारताचा पायलट प्रोजेक्‍ट सुरु होता, हा प्रोजेक्‍ट यशस्‍वी झाला आहे. आता फक्‍त प्रॅक्‍टीस सुरु आहे, खरं काम नंतर करायचे आहे. असा सूचक इशारा नरेंद्र मोदी यांनी दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सूचक वक्तव्य – नरेंद्र मोदी म्हणाले की, “तुम्ही कायम प्रयोगशाळेत जीवन व्यतीत करणारे लोक आहात. एखादे संशोधन करताना सुरुवातीला तुम्हाला एखाद्या पायलट प्रोजेक्टवर काम करण्याची सवय असते. असाच एक ‘पायलट’ प्रोजेक्ट आम्हीही यशस्वी केला आहे” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. मोदींच्या वक्तव्यानंतर सर्वांनी टाळ्यांचा गडगडाट केला. शांतीस्वरुप भटनागर पुरस्काराच्या कार्यक्रमात सर्व पुरस्कार विजेत्या संशोधकांचे मोदींनी अभिनंदन केलं.

दरम्यान भारताने दिलेल्या सज्जड इशाऱ्यानंतर शरणागती पत्करत पाकिस्ताने अभिनंदन यांची सुटका करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्य म्हणजे अभिनंदन यांना उद्या ( दि. १ मार्च ) सकाळी वाघा बॉर्डरमार्गे भारताकडे सोपविण्यात येणार आहे.