रशियामध्ये दिसला PM मोदींचा ‘साधेपणा’ ! ‘सोफा चेअर’वर बसण्यास दिला नकार, मागवली साधी खुर्ची (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियामधील एका कार्यक्रमादरम्यान साधेपणाचे एक उदाहरण सर्वांसमोर प्रस्तुत केले आहे. कार्यक्रमात स्वत:साठी केलेल्या खास व्यवस्थेअंतर्गत ठेवलेला सोफा काढून सामान्य खुर्चीवर बसण्याची इच्छा पंतप्रधानांनी व्यक्त केली. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

कार्यक्रम केवळ फोटो सत्रासाठी होता. पंतप्रधान जेव्हा तेथे आले तेव्हा त्यांनी पाहिले की त्यांच्यासाठी सोफ्याची व्यवस्था केली गेली होती तर इतर अधिकाऱ्यांना बसण्यासाठी खुर्चीची व्यवस्था केली गेली होती. हे पाहताच त्यांनी स्वत:साठी ठेवलेला एक आलिशान सोफा चेअर नाकारून इतरांसोबत खुर्चीवर बसण्यास प्राधान्य दिले.

या आधीही मोदींच्या साधेपणाचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. मोदींनी नुकतेच स्वच्छ भारत मोहिमेची सुरवात केली होती. त्यानंतर एका कार्यक्रमादरम्यान हात पुसून झाल्यानंतर मोदींनी टिशू पेपर आपल्या खिशात टाकला होता. त्यानंतर आता पुन्हा विदेश दौऱ्यावर असताना सामान्यांप्रमाणे खुर्चीवर बसण्याचा साधेपणा दाखवणारा मोदींचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –