माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त PM मोदींनी शेअर केला ‘हा’ खास संदेश !

नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आज दुसरी पुण्यतिथी आहे. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. पीएम मोदी यांनी त्यांचे स्मरण करत म्हटले की, देशाच्या विकासासाठी अटलजींना नेहमी स्मरणात ठेवले जाईल. राष्ट्रपती कोविंद आणि पीएम मोदी यांनी रविवारी सकाळी अटल बिहारी मेमोरियलमध्ये जाऊन वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण केली. याशिवाय गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीसुद्धा त्यांचे स्मरण केले. अलट बिहारी वाजपेयी तीन वेळा देशाचे पंतप्रधान होते.

पीएम मोदी यांचा व्हिडिओ संदेश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यानिमित्त एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे. 1 मिनिट 48 सेकंदाच्या या व्हिडिओची सुरूवात त्यांची प्रसिद्ध कविता – हार नहीं मानूंगा, रार नहीं ठानूंगाने केली आहे. यांनतर अटलजींचे जुने व्हिडिओ आणि फोटोंसह पीएम मोदींचा आवाज येतो.

यामध्ये पीएम म्हणतात, अटलजींच्या जीवनाबात खुपकाही बोलता येईल. त्यांच्या भाषणांची नेहमी चर्चा होत असे, परंतु जेवढी ताकद त्यांच्या भाषणा होती, त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त ताकद त्यांच्या मौनात होती. ते सभेत जेव्हा दोन-चार वाक्य बोलल्यानंतर मौन होत असत, तेव्हा लाखोंच्या गर्दीला त्या मौनातूनही संदेश मिळत असे. हा देश अटलजींचे योगदान कधीही विसरणा नाही.

अमित शाह यांनी दिली श्रद्धांजली
यानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी ट्विट केले की, भारतरत्न श्रद्धेय श्री अटल बिहारी वाजपेयीजी देशभक्त आणि भारतीय संस्कृतीचे प्रखर आवाज होते. ते राष्ट्र समर्पित राजकीय नेत्यासह कुशल संघटकसुद्धा होते.

2018 मध्ये निधन
अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म 25 डिसेंबर 1924 ला मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये झाला होता. 16 ऑगस्ट 2018 रोजी दिर्घ आजाराने दिल्लीच्या एम्समध्ये त्यांचे निधन झाले होते.