अडवाणींच्या ‘त्या’ ब्लॉगला नरेंद्र मोदींचे उत्तर, म्हणाले…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सत्ताधारी भाजपचे भीष्म पितामह आणि माजी उप पंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना आगामी लोकसभा निवडणुकीत पक्षाने तिकीट दिले नाही. त्यांच्या वयाचे कारण समोर करुन त्यांचे तिकीट कापण्यात आले. तिकीट कापल्यानंतर अडवाणी यांनी पहिल्यांदाच आपल्या ब्लॉगवरुन पक्षाच्या सध्याच्या कार्यशैलीवर टीका केली आहे.

अडवाणी यांनी आपल्या ब्लॉगमध्ये प्रथम देश, नंतर पक्ष आणि शेवटी मी असे म्हटले होते. हाच धागा पकडत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अडवाणी यांनी भाजपचा सार सांगितल्याचे म्हटले आहे. अडवाणी यांचा प्रथम देश, नंतर पक्ष आणि शेवटी मी हा मार्गदर्शक मंत्र असल्याचे मोदींनी नमूद केले. त्यांनी ट्विटरवरुन अडवाणी यांच्या ब्लॉकची लिंक शेअर केली आहे.

भाजपने अडवाणी यांना तिकीट न देता त्यांचा राजकीय प्रवासातून पत्ता कट केला आहे. तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी आपल्या वेदना ब्लॉगच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत. भाजप ६ एप्रिलला स्थापना दिवस साजरा करेल. हा क्षण भाजपमध्ये सर्वांसाठीच महत्त्वाचा आहे. आम्ही थोडे मागे पाहिले पाहिजे, पुढे पाहताना आजूबाजूलाही पाहिले पाहिजे. भाजपच्या संस्थापक असणाऱ्यांपैकी एक मी पण होतो. या भूमिकेतून देशातील जनतेशी अनुभव कथन करण कर्तव्य समजले. पक्षासह या सर्वांनी मला स्नेह आणि सन्मान दिला असल्याचे त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले आहे.

Loading...
You might also like