PM Modi Road Show In Pune | पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी ‘रोड शो’, प्रचारसभाही होणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – PM Modi Road Show In Pune | पुणे लोकसभेचे (Pune Lok Sabha) महायुतीचे (Mahayuti) भाजपाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्या प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) दिनांक २९ एप्रिल रोजी पुण्यात येणार आहेत. यावेळी मोदींचा रोड शो होणार असून त्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष असणार आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एस. पी. कॉलेजच्या मैदानात (SP College Ground) जाहीर प्रचारसभा देखील होणार आहे. या सभेत पंतप्रधान मोदी काय बोलणार हे महत्वाचे ठरणार आहे.

महायुतीच्या बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदारसंघातील उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या खडकवासला येथील निवडणूक कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी अजित पवार (Ajit Pawar) यांनी ही माहिती दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी आधी कात्रज (Katraj), एनडीए येथील मैदाने (NDA Warje) तसेच नंतर खडकवासल्यामध्ये जागेची चाचपणी करण्यात आली होती. मात्र, प्रशस्त मैदान नसल्याने स. प. महाविद्यालयाच्या मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे.(PM Modi Road Show In Pune)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेची तयारी सुरू झाली आहे. या सभेपूर्वी पुण्यात रोड शो देखील होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेची तयारी सुरू झाली आहे. या सभेपूर्वी पुण्यात रोड शो देखील होणार आहे.
पुण्यातील एस. पी. कॉलेजच्या मैदानावर चाळीस हजार लोकांच्या बसण्याची व्यवस्था होऊ शकते.
यासाठी येथील जागेवर ही सभा होणार आहे.

पुण्यातील मोदींचा रोड शो, तसेच जाहीर प्रचारसभेकडे संपूर्ण देशाचे लक्ष असणार आहे.
पंतप्रधान मोदी पुण्यातील जाहीर सभेत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Court News | सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Anant Geete On Pawar Family | शरद पवारांचं घर कोणी फोडलं? शिवसेना नेते अनंत गीतेंनी केला गौप्यस्फोट, ‘या’ बड्या नेत्याचं नाव घेतल्याने खळबळ!

Mahavir Jayanti | महावीर जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त बिबेवाडी गंगाधाम येथे भव्य शोभायात्रा; मिरवणुकीत आमदार माधुरी मिसाळ आणि लोकसभा उमेदवार मुरलीधर मोहोळ सहभागी