PM Modi Sabha In Mumbai | मुंबईत 17 तारखेला पंतप्रधान मोदींची सभा, राज ठाकरे देखील राहणार उपस्थित, सभेपूर्वी बावनकुळे-ठाकरेंची भेट

मुंबई : PM Modi Sabha In Mumbai | १७ मे रोजी मुंबईतील शिवाजी पार्कवर (Shivaji Park Mumbai) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची सभा होणार आहे. यावेळी व्यासपीठावर मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) देखील उपस्थित राहणार आहेत. ही सभा आता परवा होत असल्याने त्यानिमित्ताने मुंबईत घडामोडींना वेग आला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकत्र आल्यानंतर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या सभेपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. या सभेचे निमंत्रण, हिंदूत्वाचा अजेंडा आणि मराठी मते यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते. राज ठाकरे यांच्या मदतीने मुंबईतील मराठी मते आपल्याकडे खेचण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे.

मुंबईत शिवसेना ठाकरे गटाची (Shivsena UBT) मते मनसेच्या माध्यमातून महायुतीकडे (Mahayuti)
कशी वळवता येतील यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली.
प्रचारासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक असताना १७ तारखेच्या सभेत राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना काय
आदेश देतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (PM Modi Sabha In Mumbai)

मुंबईत १७ तारखेला होत असलेल्या मोदींच्या जाहीर सभेला आता
दोनच दिवस उरल्याने शिवाजी पार्कवर जोरदार तयारी सुरु आहे.
शिवाज पार्कच्या या सभेला महायुतीतील बडे नेते, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह मंत्री उपस्थित राहणार आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai North Lok Sabha | उत्तर मुंबई मतदारसंघात मराठी-अमराठी हे प्रचारातील मुद्दे गोयल यांच्यासाठी त्रासदायक

Swargate Pune Crime news | खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपीला स्वारगेट पोलिसांकडून अटक

Amit Shah | अमित शहांचा मोठा दावा, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींना चौथ्या टप्प्यातच बहुमत मिळाले’ (Video)