देशानं माझ्या सरकारचा आत्‍तापर्यंत फक्‍त ‘ट्रेलर’ पाहिला, संपूर्ण ‘सिनेमा’ बाकी : PM नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारने पुन्हा सत्तेवर येताच कश्मीर बाबत महत्वाचा निर्णय घेतला. भ्रष्टाचार आणि आतंकवदाविरोधात लढण्यासाठी योग्य पावले उचलली तसेच मुस्लिम महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न केले. हे सर्व फक्त शंभर दिवसाच्या कारकिर्दीत मोदी सरकारने केले. याबाबतच रांची येथे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आतापर्यंत जनतेने फक्त मोदी सरकारचा ट्रेलर पाहिलाय पूर्ण फिल्म तर अजून बाकी आहे.

रांची येथे सरकारच्या कामाचं कौतुक करताना मोदींनी प्रधानमंत्री किसान मानधन योजना सुरु करत असल्याची घोषणा केली. या योजनेमार्फत देशात नव्या व्यावसायिकांना आणि छोटे छोटे उद्योगधंदे करणाऱ्यांना अधिक फायदा होणार आहे. तसेच यावेळी पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी ‘एकलव्य मॉडेल विद्यालयाची’ सुरुवात करत असल्याचे सांगितले.

नेमकं काय म्हणाले नरेंद्र मोदी –

आम्ही कामगार आणि दमदार सरकार देण्याचे वाचन दिले होते. सरकारने शंभर दिवसाच्या कामगिरीत सर्वात वेगवान काम केले आहे. सरकारचा हा फक्त एक ट्रेलर असून पूर्ण फिल्म तर अजून बाकी आहे.
जम्मू काश्मीर आणि लडाखला विकासाच्या मोठ्या उंचीवर न्यायचे आहे. पी चिदंबरम यांचा दाखला देत सरकारने भ्रष्टाचार करणाऱ्याला त्यांच्या योग्य जागेवर पाठवले आहे. किसान योजना सुरु करून सरकारने शेतकऱ्यांना वृद्धपकाळात मोठे बळ दिले आहे. असे मोदी म्हणाले.

मोदी पुढे म्हणाले की, देशात प्रत्येक क्षेत्रात विकास होत असून गरीबांसाठी आणि शेतकर्‍यांसाठी कल्याणकारी योजना वेगाने राबविण्यात येत आहेत. तत्पूर्वी पंतप्रधानांनी झारखंड सचिवालयातील 1238 कोटी रुपये खर्चाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन केले.

मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात ‘मोर बट से राउर मन के जमे जमे जोहार’…म्हणजेच माझ्याकडून आपल्या सर्वांना नमस्कार अशा खास नागपुरी भाषेने करत जमलेल्या सर्वांची मने जिंकली.

आरोग्यविषयक वृत्त –