कधी येणार ‘कोरोना’विरूध्दची वॅक्सीन ? PM मोदी म्हणाले – ‘देशात 3-3 लशींची ट्रायल सुरू, परवानगी मिळताच चालु होईल उत्पादन’

नवी दिल्ली : देशाच्या 74व्या स्वातंत्र्य दिवसाच्या निमित्तीने पीएम नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात कोरोना वॅक्सीनबाबत म्हटले की, आज भारतात कोरोनाची एक नव्हे, दोन नव्हे, तर तीन-तीन वॅक्सीन सध्या टेस्टींगच्या टप्प्यात आहेत. शास्त्रज्ञांकडून हिरवा झेंडा मिळताच, देशात या वॅक्सीनचे मोठ्या प्रमाणात प्रॉडक्शन सुरू करण्यात येईल.

याशिवाय पीएम मोदी यांनी स्वातंत्र्याबाबत म्हटले की, स्वातंत्र्यासाठी विस्तारवादी विचार असणार्‍यांनी खुप प्रयत्न केले. पण स्वातंत्र्याच्या जोशाने त्यांच्या हेतूला गाढून टाकले. पुढील वर्षी आपण आपल्या स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षात प्रवेश करणार आहोत. एक खुप मोठा उत्सव आपल्या समोर आहे. गुलामीचा असा कोणताही कालखंड नव्हता, जेव्हा हिंदुस्तानच्या कोणत्या कोपर्‍यात स्वातंत्र्यासाठी प्रयत्न झाले नसतील, बलिदान झाले नसेल.

त्यांनी म्हटले की, विस्तारवादी विचारांनी काही देशाना गुलाम बनवले. भीषण युद्ध आणि भयंकर स्थितीत ही भारताने स्वातंत्र्याच्या युद्धात कमतरता आणली नाही. विस्तारवादाच्या भावनेने जगाला महायुद्धात ढकलले. त्यावेळी सुद्धा भारताने आपल्या स्वातंत्र्याचा जोष कमी केला नाही.

पीएम मोदी म्हणाले, आज आपण जो स्वतंत्र भारतात श्वास घेत आहोत, त्या पाठीमागे भारत मातेच्या लाखो मुला-मुलींचा त्याग, बलिदान आणि समर्पण आहे. स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवानांना नमन करण्याचा हा उत्सव आहे. जे लोक भारतात राज्य करण्याच्या हेतूने आले होते, त्यांच्या विचारांना भारताच्या विचारांनी उखडून फेकून दिले. ते भारताची प्राणशक्ती ओळखू शकले नाहीत. भारताच्या स्वातंत्र्याच्या जोषाने जगात प्रेरणास्त्रोत निर्माण केला. आता आपल्याला आत्मनिर्भर बनावे लागेल. आता दुसर्‍यांवरचे अलंबत्व नष्ट करावे लागेल. जोपर्यंत आपण इम्पोर्ट करत राहू, तोपर्यंत आपले स्किल वाढणार नाही.