PM मोदींचं नाव आणखी एका विक्रमाशी जोडलं गेलं, बनले प्रदीर्घ काळ ‘बिगर-काँग्रेस’ पंतप्रधान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर आणखी एक विक्रम नोंदवण्यात आला आहे. नरेंद्र मोदी यांनी भाजपचे सर्वात प्रदीर्घ पंतप्रधान म्हणून विक्रम केला आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे विक्रम मोडत नरेंद्र मोदी हे प्रदीर्घ काळ पीएम असणारे बिगर-कॉंग्रेस नेता बनले आहेत. अगदी बिगर-कॉंग्रेस नेते म्हणूनही मोदींनी प्रदीर्घ पंतप्रधान होण्याचा विक्रम केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आधी अटलबिहारी वाजपेयी हे दीर्घकाळ पंतप्रधान राहिले आहेत. अटलबिहारी बाजपेयी सलग २,२५६ दिवस देशाचे पंतप्रधान राहिले आहेत. १९ मार्च १९९८ रोजी अटलबिहारी बाजपेयी देशाचे पंतप्रधान बनले होते, ते सलग २२ मे २००४ पर्यंत देशाचे पंतप्रधान होते. अटलबिहारी बाजपेयी यांचा पहिला कार्यकाळ १९ मार्च १९९८ ते १३ ऑक्टोबर १९९९ दरम्यान होता, तर त्यांचा दुसरा कार्यकाळ १३ ऑक्टोबर ते २२ मे २००४ दरम्यान होता.

सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आतापर्यंत २२६० दिवस सलग पंतप्रधान राहिले आहेत. ते सलग प्रदीर्घ काळ पंतप्रधान असणारे बिगर-कॉंग्रेस आणि भाजपा नेता बनले आहेत. नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ २६ मे २०१४ पासून सुरू झाला आहे, जो आतापर्यंत चालू आहे. महत्त्वाचे म्हणजे २०१४ साली भाजप बहुमताने केंद्रात आली होती, तेव्हा २६ मे २०१४ रोजी नरेंद्र मोदींनी देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. त्यांचा पहिला कार्यकाळ २०१९ मध्ये संपला, परंतु पुन्हा एकदा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने विक्रम केला आणि नरेंद्र मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान झाले.

पंतप्रधानांच्या कार्यकाळाचा इतिहास
स्वातंत्र्यानंतर १९४७ ते २०२० पर्यंत देशाला १५ पंतप्रधान मिळाले आहेत. देशातील पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नावावर देशातील सर्वात प्रदीर्घ पंतप्रधान राहण्याचा विक्रम आहे. जवाहरलाल नेहरू प्रथमच म्हणजे ६,१३० दिवस देशाचे पंतप्रधान राहिले.

जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर इंदिरा गांधी देशाच्या दुसर्‍या क्रमांकाच्या प्रदीर्घ पंतप्रधान आहेत. देशातील पहिल्या महिला म्हणून इंदिराजींच्या नावावर ५,८२९ दिवस पंतप्रधान राहण्याची नोंद आहे. तर २४ जानेवारी १९६६ ते २४ मार्च १९७७ पर्यंत म्हणजे ११ वर्षे ५९ दिवस सतत पंतप्रधान राहिल्या. त्यानंतर दुसऱ्या वेळी १४ जानेवारी १९८० ते ३१ ऑक्टोबर १९८४ पर्यंत पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारला. इंदिरा गांधी यांच्या हत्येपूर्वी त्या ४ वर्षे २९१ दिवस पंतप्रधानपदावर राहिल्या.

इंदिरा गांधी यांच्यानंतर डॉ. मनमोहन सिंह प्रदीर्घ काळ पंतप्रधान राहिले. डॉ. मनमोहन सिंह यांनी यूपीए-१ आणि यूपीए-२ दरम्यान २००४ ते २०१४ पर्यंत म्हणजे १० वर्षे पंतप्रधान राहिले. मनमोहन सिंग यांच्या नावावर ३,६५६ दिवस पंतप्रधान असल्याची नोंद आहे.