PM Modi-Sharad Pawar Meeting | ED वर चर्चा ? पवार – मोदींच्या भेटीने राजकीय चर्चांणा उधाण !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM Modi-Sharad Pawar Meeting | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची संसदेतील पंतप्रधान कार्यालयात Prime Minister’s Office (PMO) ही भेट झाली. जवळपास 20 ते 25 मिनिटे ही भेट झाली. या भेटीमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली. मात्र राज्यात सुरू असलेल्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडींच्या पार्श्वभूमीवर ही भेट (PM Modi-Sharad Pawar Meeting) झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

 

शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांची जेव्हा जेव्हा भेट होते त्यावेळी देशभर चर्चा होते. मात्र आता ज्या टायमिंगला भेट (Pawar-Modi Meeting) झाली आहे त्यामुळे अनेक तर्क – वितर्क लावले जात आहेत. मंगळवारी शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर ईडीने (ED) कारवाई केली. त्यासोबतच राज्य सरकारनेही ईडीच्या अधिकाऱ्यांविरोधात असलेल्या कथित आरोपांची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना केली आहे. (PM Modi-Sharad Pawar Meeting)

 

ईडीने कारवाई केली आणि दुसऱ्याच दिवशी शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली.
त्यामुळे या भेटीमध्ये कोणती चर्चा झाली ?, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. या भेटीअगोदर शरद पवार यांच्या दिल्लीमधील निवासस्थानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) स्नेहभोजनासाठी गेले होते.

 

दरम्यान, पंतप्रधान मोदी आणि पवारांच्या भेटीनंतर राज्याच्या राजकारणातील गणितं बदलतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
या भेटीबाबत शरद पवार काही खुलासा करतात का ?, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

 

Web Title :- PM Modi-Sharad Pawar Meeting | NCP chief sharad pawar meet to pm narendra modi at pmo

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा