PM Modi-Sharad Pawar Meeting | शरद पवारांनी का घेतली PM मोदींची भेट ? राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – PM Modi-Sharad Pawar Meeting | राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi Government) मंत्री आणि नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणेचा (Central Investigation Agency) ससेमिरा लागला आहे. तर दुसरीकडे दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली. तपास यंत्रणाच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र या भेटीचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. अशातच राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी (MLA Amol Mitkari) यांनी या दोन नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी आमदार अमोल मिटकरी यांनी सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या प्रतिक्रियेचा समचार घेतला. (PM Modi-Sharad Pawar Meeting)

 

या दोन नेत्यांमध्ये झालेल्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले असतानाच राष्ट्रवादीकडून यावर पहिली प्रतिक्रिया आली आहे.
आमदार अमोल मिटकरी म्हणाले, सर्वच पक्षाचे नेते एकमेकांना भेटत असतात.
शरद पवार यांना 55 वर्षाचा संसदीय राजकारणाचा (Parliamentary Politics) अनुभव आहे, त्यामुळे त्यांनी पंतप्रधानांची भेट घेण्यात गैर काहीच नाही.
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणांकडून ज्या कारवाया सुरु आहेत, त्याबद्दलही या भेटीत चर्चा झाली असावी.
मात्र मलाही या भेटीत नेमकी कोणत्या मुद्यांवर चर्चा झाली याची माहिती नसल्याचे मिटकरी म्हणाले. (PM Modi-Sharad Pawar Meeting)

आमच्यासाठी दोन्ही नेते महत्त्वाचे
नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या प्रतिक्रियेची सध्या जोरदार चर्चा आहे.
भाजपची (BJP) शिवसेनेसोबत (Shivsena) नक्कीच कटुता आहे, मात्र राष्ट्रवादीशी कटुता असण्याचं सध्या कोणतं कारण नसल्याचे मुनगंटीवार म्हणाले होते.
या प्रतिक्रियेचा समाचार घेताना मिटकरी म्हणाले, केंद्रीय तपास यंत्रणांनी कसलंही तथ्य नसताना अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर कारवाई केली.
राष्ट्रवादी हा एक पक्ष नाही तर एक कुटुंब आहे, त्यामुळे हे दोन्ही नेते आमच्यासाठी महत्त्वाचे असून त्यांच्यावर झालेली कारवाई चुकीची आहे.

 

Web Title :- PM Modi-Sharad Pawar Meeting | ncp leader amol mitkari reaction on sharad pawar pm narendra modi meeting

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा