PM Modi-Sharad Pawar Meeting | शरद पवार भेटण्यापुर्वी पीएम मोदी कोणाला भेटले? भेटीगाठीमुळं राजकीय चर्चेला उधाण, समीकरणं बदलणार ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची दिल्लीत भेट घेतली. सकाळी दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. या भेटीचा तपशील समजू शकला नाही. परंतु अनेक राष्ट्रीय विषयांवर चर्चा झाल्याचं शरद पवार (Sharad Pawar) यांनी ट्विट करुन सांगितलं. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा करत असतानाचा फोटो ट्विट केला आहे.

पंतप्रधानांना भेटण्यापूर्वी यांची घेतली भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या भेटीमागील घटनाक्रम खूप महत्त्वाचा आहे. आज शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांची पंतप्रधान कार्यालयात तासभर चर्चा झाली. पंतप्रधान मोदी यांना भेटण्यापूर्वी दोन केंद्रीय मंत्र्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. केंद्रीय मंत्री पियूष गोयल (Piyush Goyal) आणि राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी पवार यांची भेट घेतली. त्यानंतर शरद पवार पंतप्रधानांच्या भेटीला गेले.

काल फडणवीस तर आज पवार दिल्लीत

आज शरद पवार दिल्लीत गेले आहेत. तर काल (शुक्रवार) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दिल्लीत होते. त्यांनी मोदींची भेट घेतली. या दोन नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप समजू शकले नाही. त्यातच लगेच दुसऱ्या दिवशी शरद पवार दिल्लीत दाखल झाले. त्यांनी मोदींची भेट घेतली. यामुळे बैठकांचा घटनाक्रम चर्चेचा विषय ठरला आहे. या भेटीगाठींमुळे राज्यातील राजकीय समिकरणे बदलणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हा केवळ योगायोग ?

केंद्र सरकारमधील भाजपचे मंत्री शरद पवार यांची भेट घेत असताना राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील काल दिल्लीवारी केली. फडणवीस यांनी दिल्ली दौऱ्यात नवीन मंत्र्यांची भेट घेतली. परंतु फडणवीसांच्या दिल्ली भेटीचं टायमिंग चर्चेचा विषय ठरत आहे. काल फडणवीस दिल्लीत होते. तर आज नागपूरात. त्यानंतर आज मोदी-पवार भेट, हा निव्वळ योगायोग आहे की आणखी दुसरे काही, अशी चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

मागील महिन्यात ठाकरे-मोदींची भेट

मागील महिन्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) दिल्लीला गेले होते.
त्यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजीत पवार, मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख अशोक चव्हाण होते.
या तीन नेत्यांसोबत मोदींनी बैठक घेतली.
या बैठकीनंतर मोदी-ठाकरे यांच्यात बैठक झाली.
आता मोदी आणि पवार यांच्यात बैठक झाली.
त्यामुळे भाजपला सत्तेपासून दूर ठेवणाऱ्या दोन पक्षांच्या प्रमुखांशी मोदी थेट संपर्क ठेवून असल्याचे पहायला मिळत आहे.

Web Title : PM Modi-Sharad Pawar Meeting | pm narendra modi meets bjp leader devendra fadnavis meeting ncp chief sharad pawar

हे देखील वाचा

Mumbai : DRI कडून लक्झरी कार ‘तस्करी’च्या रॅकेटचा केला ‘पर्दाफाश’