PM Modi-Sharad Pawar Meeting | PM मोदींच्या भेटीनंतर भाजपसोबत जाणार का?; शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM Modi-Sharad Pawar Meeting | राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) कायम राज्याच्याच नाहीतर देशातील राजकारणाचे केंद्रबिंदू ठरले आहेत. अशातच शरद पवार यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली. पवारांनी घेतलेल्या भेटीमुळे अनेक तर्क वितर्क लावले जात आहे. अशाच प्रकारे मोदींसोबतच्या भेटीनंतर भाजपसोबत (BJP) जाणार का?, असा सवाल पवारांना करण्यात आला. यावर पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली. (PM Modi-Sharad Pawar Meeting)

 

महाविकास आघाडी भाजपविरोधात (BJP) उभी आहे. आम्ही कधीच भाजपसोबत नव्हतो, त्यामुळे आमचा त्यांच्यासोबत जायचा प्रश्नच येतच नाही. भाजपविरोधात पर्याय द्यायचं आम्ही प्रयत्न करत आहोत. महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नाही, हे सरकार 5 वर्षे पुर्ण करणार असून पुन्हा येणार असल्याचं शरद पवारांनी सांगितलं. (PM Modi-Sharad Pawar Meeting)

 

शरद पवारांनी मोदींसोबत भेट घेण्याआधी त्यांच्या निवासस्थानी रात्री केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची भेट घेतली होती.
त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांणा उधाण आलं होतं.
मात्र पवारांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं असून या भेटीमध्ये शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut)
आणि राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्याबाबत बोललो असल्याचं पवारांनी सांगितंल.

दरम्यान, 12 आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा रखडला आहे, त्यावरही राज्यपालांनी निर्णय घेतला नाही.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे नियमांनुसार काम करत नाहीत.
दुसरी गोष्ट शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईची माहिती पंतप्रधानांना दिली.
यावर आता योग्य ते निर्णय मोदी घेतील अशी अपेक्षा असल्याचं शरद पवार म्हणाले.

 

Web Title :- PM Modi-Sharad Pawar Meeting | we stood strong against bjp and mahavikas aghadi is strong says sharad pawar in delhi after meeting pm modi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

University Campus Colleges Starting Offline In Maharashtra | राज्यातील विद्यापीठ, महाविद्यालये ऑफलाईन पद्धतीने सुरु होणार – मंत्री उदय सामंत यांची माहिती

 

Anti Corruption Bureau (ACB) Pune | 2 लाखाची लाच मागणारे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यकारी अभियंता प्रमोद तुपे आणि उप अभियंता अरविंद फडतरे ‘गोत्यात’, एसीबीकडून गुन्हा दाखल

 

API Vijaykumar Shinde | दीड महिन्यात 40 गुन्हे उघडकीस, API विजयकुमार शिंदे यांचा CP अमिताभ गुप्ता यांच्याकडून प्रशस्तीपत्र देऊन सन्मान