PM मोदींनी खडसावले म्हणाले… मला ‘वादात’ अडकवू नका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असताना सरकारसमोर कोरोना रोखण्याचं मोठं आव्हान निर्माण झालं आहे. देशात 5 हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 140 हून अधिक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.अशातच सोशल मीडियावर अफवांचे पेव फुटले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्साही कार्यकर्त्यांना फटकारलं आहे. पंतप्रधानांनी ट्विट करून म्हटलं आहे की, माझ्या सन्मानासाठी 5 मिनिटे उभं राहून गौरव करावा अशा प्रकारचे काही लोक मोहीम सुरु करत आहेत हे माझ्या कानावर आलं आहे. प्रथमदर्शनी मोदींना वादात टाकण्याचा हा डाव वाटतो अशी शंका त्यांनी उपस्थित केली आहे.

जर माझा गौरव करण्याची कोणाची सदिच्छा असेल, माझ्याप्रती प्रेमभावना असेल तर एका गरीब कुटुंबाची जबाबदारी तोपर्यंत घ्या, जोवर देशातून कोरोना व्हायरसचं संकट संपत नाही. यापेक्षा माझा गौरव काही असू शकत नाही असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून केले आहे. लॉकडाऊनच्या काळात सोशल मीडियात अनेक अफवांना उधाण आलं आहे. यातच एक अफवा म्हणजे मोदी यांच्या सन्मानासाठी 5 मिनिटं उभं राहून त्यांचा गौरव करावा असं आहे, मात्र या अफवेबद्दल खुद्द पंतप्रधानांनी नरेंद्र मोदींनी भाष्य केलं आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like