PM Modi | पीएम मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल, म्हणाले- आणीबाणीचा काळा दिवस विसरणे शक्य नाही

नवी दिल्ली : वृत्त संस्था – PM Modi | माजी पंतप्रधान इंदिरा गांधीनी (Former Prime Minister Indira Gandhi) देशात 25 जून 1975 रोजी आणीबाणी (Emergency) लागू केली होती. आज त्या दिवसाला 46 वर्ष पूर्ण होत आहेत. आणीबाणी हा भारताच्या इतिहासातील सर्वात काळ्या दिवसांपैकी एक म्हणून ओळखला जातो. आणीबाणीच्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi) कॉंग्रेसवर (Congress) हल्लाबोल केला आहे. आणीबाणीचा काळा दिवस विसरता येणं शक्य नाही, असे त्यांनी म्हटले आहे. तत्कालीन काँग्रेसने केवळ आपल्या लोकशाही मूल्यांना चिरडल नाही तर आपल्या महापुरुषांचा ऐतिहासिक वारसादेखील अंधारात ठेवल्याचे पंतप्रधान मोदीं (Prime Minister Narendra Modi) नी म्हटले आहे.

1975 ते 1977 या काळात संस्थांचा नाश झाला. आपण भारतीय लोकशाही संकल्पना बळकट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा संकल्प करू आणि राज्यघटनेत नमूद केलेल्या मूल्यांचे पालन करु असे ट्विट पंतप्रधान मोदींनी केले आहे. तसेच इन्स्टाग्रामवर भाजपद्वारे जारी केलेल्या आणीबाणीशी निगडीत स्लाईडस पंतप्रधानांनी शेअर केल्या आहेत.

आणीबाणी दरम्यान तत्कालीन काँग्रेस सरकारने कोणकोणत्या गोष्टीवर बंदी घातली होती. हे या स्लाईडमधून भाजपने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपच्या म्हणण्यानुसार, 1975 ते 1977 दरम्यान आणीबाणीच्या काळात स्वातंत्र्य सैनिकांना तसेच शहीद देशभक्त चंद्रशेखर आझाद, भगत सिंह यांच्यावर तयार केलेल्या सिनेमांवरही काँग्रेसने बंदी घातली होती. याशिवाय किशोर कुमार यांचे गाणे, राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांच्या विचारांच्या प्रसारालाही काँग्रेसकडून बंदी घातली होती.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Titel :  pm modi slams on congress over emergency anniversary says congress trampled over our democrati ethos

हे देखील वाचा

Pune News | पुण्यातील आढावा बैठक अजित पवारांच्या अनुपस्थितीत; राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा

Pune Crime Branch Police | वाहन चोर्‍या करणार्‍या सराईताला गुन्हे शाखेकडून अटक, स्वतःच्या सोसायटीच्या पार्किंगमधूनही…

Sanjay Raut । भाजपाच्या कार्यकारिणीत अजित पवारांसंबंधी झालेल्या ‘त्या’ ठरावावरुन संजय राऊत भडकले, म्हणाले..