‘या’ 7 महिलांनी दिवसभर सांभाळलं PM मोदींचं ट्विटर अकाऊंट, जाणून घ्या (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले ट्विटर हँडल ७ महिलांना सोपविले होते. जाणून घेऊया या ७ महिला कोण आहेत आणि त्यांनी त्यांच्या क्षेत्रात बजावलेली कामगिरी काय आहे ?

1) स्नेहा मोहनदास :

sneha mohandoss

चेन्नईच्या स्नेहा मोहनदास यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर हँडलवरून सर्वात आधी ट्विट केले. त्या फूड बँक इंडियाच्या संस्थापक आहेत. फूड बँक बेघरांना खाद्य पुरविण्यासाठी काम करते.

2) मालविका अय्यर :

malvika ayyar

मलाविका अय्यर इंटरनॅशनल मोटिव्हेशनल स्पीकर, अपंगांच्या हक्कांसाठी लढणारी कार्यकर्ती, सामाजिक कार्यात पीएचडी सोबतच एक फॅशन मॉडेल म्हणून ओळखली जाते. वयाच्या 13 व्या वर्षी अपघातात दोन्ही हात गमावूनही तिने समाजात वेगळी ओळख निर्माण केली आहे.


3) आरिफा :

arifa

काश्मीरच्या श्रीनगरमधील महिला कारागीरांचे जीवन बदलण्यात आरिफाचे मोठे योगदान आहे. त्या काश्मीरच्या पारंपारिक नामदा विणकर आहे. काश्मीरमध्ये लुप्त होत चाललेल्या या कलेला आरीफाने नवीन दर्जा दिला.

4) कल्पना :

kalpna

कल्पना यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून घरापासून ते समुदायापर्यंत वाटर इन हाउसहोल्ड मोहीम राबविली. पाणी ही एक मौल्यवान वारसा असून भविष्यातील पिढ्या यापासून वंचित राहिल्या नाही पाहिजे, असे त्यांचे म्हणणे आहे.

5) विजया पवार :

vijaya pawar

विजया यांनी बंजारा हस्तकलेच्या क्षेत्रात आपल्या कामाची खास ओळख निर्माण केली आहे. त्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या रहिवासी आहेत.

6) कलावती देवी :

kalawati devi

कानपूरच्या कलावती देवी स्वच्छतेचे काम करतात. निरोगी राहण्यासाठी स्वच्छता आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. स्वच्छतेबाबत त्यांचा प्रयत्न यशस्वी ठरला असून हजारो शौचालय बांधण्यात यश मिळाले आहे.

7) वीणा देवी :

veena devi

मुंगेरच्या वीणा देवी यांनी सर्वात शेवटी ट्वीटर हँडल घेतले. ज्यामध्ये त्यांनी घरी मशरूमची लागवड करुन महिला कशा आत्मनिर्भर होत आहेत हे सांगितले.