‘कोरोना’मुळे तब्बल 100 दिवस रूग्णालयात असलेल्या काँग्रेस नेत्याला पंतप्रधानांचा फोन

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोना विषाणूची लागण झालेल्या माजी केंद्रीय मंत्री भरत सिंह सोळंकी यांना तब्बल 101 दिवसांनंतर काल रुग्णालयातून सोडण्यात आले. डिस्चार्जनंतर त्यांनी खासगी रुग्णालयातील कर्मचार्यांनी चांगले उपचार देऊन त्यांचे प्राण वाचवल्याबद्दल आभार मानले आहेत. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी फोन करून सोळंकी यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे.

भरत सोळंकी यांना फोन करुन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. कोरोना विरुद्धच्या 100 दिवसांच्या लढाईदरम्यान त्याने उल्लेखनीय धैर्य दाखवले आहे. त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो. असे ट्वीट मोदी यांनी केले आहे. गुजरातमधील आनंद जिल्ह्यातील बोरसाड येथे राहणार्‍या सोळंकी यांना 22 जूनला वडोदरा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

तब्येत बिघडल्यानंतर त्यांना 30 जून रोजी अहमदाबादच्या सीआयएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले. 100 दिवसांनतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. कोरोनाला गांभीर्याने घ्या, सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क घाला. हॉस्पिटलमध्ये भरती होण्यापेक्षा मास्क घालणे कधीही उत्तम असल्याचे सोळंकी यांनी म्हटले आहे.