PM Modi | PM मोदींना कपिल देव म्हणाले – ‘तुम्ही क्रीडा जगतातचे हृदय जिंकले’, पंतप्रधानांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी काही दिवसांपूर्वी टोकिओ ऑलम्पिक पदक विजेत्यां (Tokyo Olympic medalists) शी चर्चा केली होती. या दरम्यान पीएम मोदींनी (PM Modi) खेळाडूंसोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. तसेच खेळाडूंनी सुद्धा आपले अनुभव सांगितले. ऑलम्पिक विजेत्या खेळाडूंशी पीएमचे (PM Modi) हे वागणे माजी क्रिकेट वर्ल्डकप विजेता कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांना खुप आवडले.

क्रीडा जगताचे हृदय जिंकलेत – कपिल देव (You Won the heart of the sports world – Kapil Dev)
कपिल देव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खुप कौतूक केले. कपिल देव यांनी ट्विट करून (Kapil Dev tweeted) लिहिले की, ऑलम्पियन्ससोबतचा तुमचा संवाद पाहिला आणि खुप चांगले वाटले. यामुळे प्रत्येक खेळाडू सोबत ताळमेळ राहिल. आज आपण संपूर्ण क्रीडा जगताचे हृदय जिंकलेत. जय हिंद!

कपिल, तुम्ही क्रीडाप्रेमींसाठी प्रेरणास्त्रोत – मोदी (Kapil, you are a source of inspiration for sports lovers – Modi)
इतकेच नव्हे, तर कपिल देव यांनी एका मोठ्या लेखात लिहिले आहे की, कशाप्रकारे मोदींनी संपूर्ण क्रीडा जगताचे हृदय जिंकले. तर, कपिल देव यांच्या या ट्विटला उत्तर देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले की, कपिल देव, या शब्दांसाठी तुमचे धन्यवाद. तुम्ही सर्व क्रीडाप्रेमींसाठी प्रेरणास्त्रोत आहात. आपल्या सर्वांना मिळून काम करावे लागेल आणि हे ठरवावे लागेल की भारतीय खेळ भविष्यात नव्या उंचीवर पोहचतील.

मोदी असे करणारे पहिले असू शकतात
कपिल देव यांनी द स्टेट्समॅनमध्ये लिहिलेल्या आपल्या कॉलममध्ये लिहिले आहे की, हे स्पष्ट नाही की, भारताच्या एखाद्या पंतप्रधानाने म्हटले असावे की, त्यांना आपल्या देशात क्रीडा संस्कृती बनवायची आहे. त्यांनी आई-वडिलांना त्या मुलांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले, ज्यांना खेळ खेळायचे आहेत. मोदी असे करणारे पहिले असू शकतात.

 

त्यांनी खेळाडूंची विचारपूस केली – कपिल देव

कपिल देव यांनी पुढे लिहिले, ऑलम्पिकच्या दरम्यान सुद्धा पंतप्रधान खेळाडूंसोबत चर्चा केली होती, परंतु त्यामध्ये भाषणाची औपचारिकता नव्हती. त्यांनी बजरंग पुनियाचा दृढ संकल्प आणि रवि दहियाला प्रतिस्पर्ध्याने घेतलेल्या चाव्याबाबत विचारपूस केली. तसेच, त्यांनी नीरज चोपडाला विचारले की, त्याला कसे समजले की भाला फेकताच आपल्याला विजय मिळाला होता.

हे खेळ संस्कृतीला प्रोत्साहन देणारे
कपिल देव पुढे लिहितात, सर्वात मोठी गोष्ट ही आहे की,
भारतीय लोकशाहीतील प्रमुख व्यक्ती समजते की, खेळ आणि खेळाची संस्कृती महत्वाची आहे.
हेच खेळ संस्कृतीला प्रोत्साहन देणारे आहे, जे मोदी यांच्या सर्वात मोठ्या वारसापैकी एक असेल.

क्रीडा साहित्यावर कोणतेही शुल्क नको
एक खेळाडू म्हणून मी क्रीडा जगताला पंतप्रधानांकडून प्रेम आणि पाठींबा मिळवताना पाहून खुप आनंदी आहे.
मला हे सुद्धा म्हणायचे आहे की, जर आपल्याला भविष्यात आणखी पदके जिंकायची असतील तर आपल्याला खेळाच्या पायाभूत संरचनेकडे लक्ष द्यावे लागेल.
आणि खेळाच्या साहित्यावर कोणतेही शुल्क असू नये जे साहित्य अ‍ॅथलीटसाठी आवश्यक असते.

Web Title :- pm modi tells kapil dev you have been a constant source of inspiration for all sports lovers

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | कोयत्याने वार करून पत्नीचा खुन करणार्‍यास कोठडी

Coronavirus in Maharashtra | दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 5,132 नवीन रुग्ण, 8,196 रुग्णांना डिस्चार्ज

Satara Crime | मेहुण्यानेच केला भावोजीचा खून? सातारा जिल्ह्यात खळबळ