राज्यात नरेंद्र मोदींच्या 9 सभा, जाणून घ्या कधी व कोठे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी युतीने राज्यात जोरदार तयारी सुरु केली असून त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदींच्या सभेचा एक मास्टर प्लॅन तयार केला आहे. मोदी महाराष्ट्रामध्ये एकूण नऊ प्रचार सभा घेणार आहेत. मोदी यांची पहिली सभा 13 ऑक्टोबरला साकोली विधानसभा मतदारसंघात होणार आहे. तर शेवटची सभा मुंबईत 18 ऑक्टोबरला होईल. ही शिवसेना व भाजपची संयुक्त सभा असेल.

नरेंद्र मोदी यांच्या विधानसभा प्रचारसभा

13 ऑक्टोबरला जळगाव व साकोलीमध्ये सभा होणार आहे. त्यानंतर 16 ऑक्टोबरला अकोला, परतूर, पनवेल या ठिकाणी सभा होईल. 17 ऑक्टोबरला पंकजा मुंडे यांच्या परळी मतदारसंघात मोदी सभा घेतील. लोकसभा पोटनिवडणुसाठी भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि विधानसभेसाठीचे पक्षाचे उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारासाठी मोदी सातारा येथे सभा घेणार आहेत. त्यानंतर पुण्यात मोदी यांची सभा होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शेवटची सभा मुंबईत 18 ऑक्टोबरला होईल. ही शिवसेना व भाजपची संयुक्त सभा असेल. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही त्यात सहभागी होतील.

 

visit : Policenama.com