PM Modi | पीएम मोदी सोमवारी लाँच करतील e-RUPI, जाणून घ्या काय आहे ई-रुपी, कसे करते काम आणि काय होईल फायदा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) सोमवारी म्हणजे 2 ऑगस्टला इलेक्ट्रॉनिक व्हाऊचर आधारित डिजिटल पेमेंट सोल्युशन ई-रुपी (e-RUPI) लाँच करतील. पीएम नरेंद्र मोदींचा हा कार्यक्रम व्हर्च्युअली असेल. ई-रुपीला तुम्ही ई-आरयूपीआय सुद्धा म्हणू शकता. हे एक पर्सन आणि पर्पज स्पेसिफिक डिजिटल पेमेंट सोल्युशन आहे.

पीएमओकडून दिलेल्या माहितीनुसार, अनेक वर्षापासून हे ठरवण्यासाठी कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत की, सरकार आणि लाभार्थ्यामध्ये लिमिटेड टच पॉइंट्ससह, लीक-प्रूफ पद्धतीने लाभ इच्छित लाभार्थ्यापर्यंत पोहचावा. आणि इलेक्ट्रॉनिक व्हाऊचर सरकारची ही इच्छा पुढे नेत आहे.

ई-रुपी डिजिटल पेमेंट (ऑनलाइन पेमेंट) साठी एक कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस आणि कॉन्टॅक्टलेस साधन आहे. पीएमओनुसार, ई-रुपी एक क्यूआर कोड किंवा एसएमएस स्ट्रिंग-आधारित ई-व्हाऊचर आहे, जे लाभार्थ्याच्या मोबाइल फोनपर्यंत पोहचवले जाते. यास नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने आपल्या यूपीआय प्लॅटफॉर्म, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या सहकार्याने विकसित करण्यात आले आहे.

ई-रुपी, सर्व्हिसच्या स्पॉन्सर्सला कोणत्याही फिजिकल इंटरफेसच्या डिजिटली पद्धतीशिवाय लाभार्थी आणि सेवा देणार्‍यांना लाईनअप करते.
याशिवाय हे सुद्धा ठरवते की, व्यवहाराची पूर्ण प्रक्रिया होईपर्यंत सेवा प्रदात्याला पेमेंट होऊ नये.

ई-रुपीची प्रकृती प्री-पेड आहे, यासाठी कोणत्याही मध्यस्थाच्या भागीदारीशिवाय सेवा प्रदाता वेळेवर पेमेंटचा विश्वास देते.

ई-रुपी, वेल्फेयर स्कीमच्या सर्व्हिसची लीक-प्रूफ डिलिव्हरी ठरवण्याच्या दृष्टीने एक क्रांतीकारी उपक्रम आहे.
ई-रुपीचा उपयोग माता आणि बाल कल्याण योजनांतर्गत औषधे आणि पोषणसंबंधी मदत देणार्‍या योजनांतर्गत सेवा देण्यासाठी केला जाऊ शकतो.
याशिवाय आयुष्यमान भारत योजनेत सुद्धा उपयोग होऊ शकतो.

Web Tital : pm modi to launch digital payment solution e rupi all you need to know about e rupi work used etc

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

ICICI Bank ने आजपासून केला मोठा बदल, ग्राहकांना खर्च करावे लागतील जास्त पैसे; जाणून घ्या

Coronavirus | केंद्राकडून राज्याला अलर्ट ! महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पुन्हा संपूर्ण Lockdown होणार?

Modi Government | खुशखबर ! नोकरी करणार्‍यांना मोफत मिळेल 7 लाखांची ‘ही’ सुविधा, जाणून घ्या कसा घ्यायचा लाभ?