Corona Vaccination : आज PM मोदी करणार जगातील सर्वात मोठ्या कोविड लसीकरण अभियानाची सुरूवात, बनवण्यात आली 3006 केंद्र

नवी दिल्ली : भारतात पहिल्या दिवशी तीन लाखांपेक्षा जास्त आरोग्य कर्मचार्‍यांना कोविड-19 च्या लसीचा डोस देण्यासह आजपासून (16 जानेवारी) जगातील सर्वात मोठे लसीकरण (Corona Vaccination) अभियान सुरू होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सकाळी साडेदहा वाजता देशात पहिल्या टप्प्यातील कोविड-19 लसीकरण (Corona Vaccination) अभियानाची सुरूवात करतील. संपूर्ण देशात एकावेळी लसीकरण अभियानाची सुरुवात होईल आणि सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये यासाठी एकुण 3006 लसीकरण केंद्र बनवण्यात आली आहेत.

राजस्थानमध्ये जयपुरच्या सवाई मान सिंह मेडिकल कॉलेजचे प्राचार्य सुधीर भंडारी यांना सर्वप्रथम लसीचा डोस दिला जाईल, तर मध्यप्रदेशमध्ये एका हॉस्पीटलच्या सुरक्षा रक्षकाला आणि एका सहायकासह अन्य लोकांना सर्वप्रथम लस दिली जाईल. मोदींनी म्हटले आहे की, देश कोरोना व्हायरस महामारीच्या विरोधात शनिवारी निर्णायक टप्प्यात प्रवेश करेल. त्यांनी ट्विट केले, 16 जानेवारीला देशस्तरावर कोविड-19 लसीकरणाला सुरुवात होईल. शनिवारी साडेदहा वाजता अभियानाचा शुभारंभ होईल.

आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी घेतला तयारीचा आढावा
पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे की, हे जगातील सर्वात मोठे लसीकरण असेल, ज्यामध्ये संपूर्ण देश सहभागी केला जाईल आणि लोकसहभागच्या सिद्धांतावर याच्या सुरुवातीसाठी सर्व तयारी झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी राष्ट्रव्यापी लसीकरण अभियानाच्या तयारीचा आढावा घेतला आणि आरोग्य मंत्रालयाच्या निर्माण भवन परिसरात बनवण्यात आलेल्या विशेष कोविड-19 नियंत्रण कक्षाचा आढावा घेतला.