PM नरेंद्र मोदींनी शहिदांना वाहिली ‘नॅशनल वार मेमोरियल’वर श्रद्धांजली, ‘ती’ परंपरा खंडीत ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रजासत्ताक दिनीची परेड सुरु होण्यापूर्वी आतापर्यंत पंतप्रधान व तिन्ही दलाचे प्रमुख इंडिया गेटवर जाऊन शहिदांना श्रद्धांजली वाहण्याची परंपरा होती. यंदा प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी, सीडीएस आणि तिन्ही दलाचे प्रमुख यांनी नॅशनल वॉर मेमोरियल वर जाऊन श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर ते राजपथाकडे रवाना झाले.

गेल्या वर्षी २५ फेब्रुवारी २०१९ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नॅशनल वॉर मेमोरियलचे लोकार्पण केले होते. १९४७, १९६२, १९७१, श्रीलंका शांती सेना आणि कारगिल युद्धात शहीद झालेल्या २५ हजारांहून अधिक जवानांच्या स्मरणार्थ हे स्मारक बनविण्यात आले आहे.

१९७१ च्या युद्धानंतर दिल्लीत इंदिरा गांधी यांनी भारत -पाक युद्धातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अमर जवान ज्योतीची स्थापना इंडिया गेट येथे केली. २६ जानेवारी १९७२ रोजी त्याचे इंदिरा गांधी यांनी उद्घाटन केले होते. इंडिया गेटच्या खाली ही अमर जवान ज्योती बनविण्यात आली आहे. २६ जानेवारी १९७२ पासून पंतप्रधान आणि तिन्ही दलाचे प्रमुख या ठिकाणी येऊन शहिद जवानांना श्रद्धांजली अपर्ण केली आहे. यंदा प्रथमच ही परंपरा खंडित झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीफ ऑफ डिफेंस स्टाफ आणि तिन्ही दलाचे प्रमुख यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर जाऊन शहिद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.

फेसबुक पेज लाईक करा – 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like