आज देव दिवाळीनिमित्त काशीला जाणार PM मोदी, 15 लाख दिव्यांच्या प्रकाशाने उजळणार बनारसचा घाट

वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी काशीला जाणार आहेत. दुपारनंतर ते येथे येत आहेत. ते कार्तिक पोर्णिमेनिमित्त आयोजित भव्य देव-दिवाळी सोहळ्यात सहभागी होऊन दिपदानाचे नयनरम्य दृश्यदेखील पाहतील.

सहापदरी महामार्गाचा लोकार्पण सोहळा
कोरोना काळानंतर पीएम मोदींचा वाराणसीमधील हा पहिला आणि एकुण 23वा दौरा आहे. मात्र, लॉकडाऊनच्या दरम्यान ते व्हिडिओ आणि टेलीफोनद्वारे मतदार संघाच्या संपर्कात होते. आज पीएम राजा तलावाच्या जवळ खजुरीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणाच्या 2447 कोटी रूपयांच्या राजा तलाव-हंडिया सहापदरी मार्ग योजनेचे लोकार्पण करतील. येथे 5000 भाजपा कार्यकर्त्यांच्या सभेला ते संबोधित करतील.

प्रोटोकॉलनुसार, ते दुपारी 2.10 वाजता आपल्या विमानाने बाबतपुर एयरपोर्टवर येतील. येथून लष्कराच्या हेलिकॉप्टरने खजुरीत उतरतील. सुमारे नऊ महिन्यानंतर येत असलेले खासदार आणि पीएमच्या स्वागतासाठी काशीवासी उत्सुकत असल्याचे सांगण्यात आले. शहरापासून गावांचे चौक, रस्ते, इमारतींवर भगवे झेंडे लावण्यात आले आहेत. ठिकठिकाणी केंद्र सरकारच्या योजना आणि पीएम मोदी यांच्या कार्याचे होर्डिंग आणि बॅनर दिसत आहेत. रात्री 8.50 वाजता ते दिल्लीला रवाना होतील.

पीएम मोदींनी दिप लावल्यानंतर उजळणार घाट
देव दिवाळीला प्रथमच पंतप्रधान या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे असणार आहेत. राजघाटावर सायंकाळी सुमारे सव्वा पाच वाजता पंतप्रधानांनी पहिला दिवा लावल्यानंतर चारही दिशेला दिव्यांच्या प्रकाशाने घाटावर झगमगाट होणार आहे. या वर्षी प्रथमच गंगापारमध्ये दीपदानासह एकुण 15 लाख दिवे लावले जातील 15 प्रमुख घाटांवर संस्कृतीक विभागाकडून सांस्कृतिक कार्यक्रमांचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे.

दीपदानानंतर पीएम क्रूजद्वारे तासभर गंगा किनार्‍यावरील दीपदानाचे दृश्य पाहतील. येथे रामायणावर आधारित लेजर शो सुद्धा पाहतील. तत्पूर्वी काशी विश्वनाथ मंदिरात दर्शन घेतील. पंतप्रधान गंगा घाटावरून रस्ते मार्गाने सारनाथला जातील. येथे सुमारे अर्धातास भगवान बुद्धांच्या जीवनावर आधारित लाइट अँड शो पाहतील.