पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ आणि ९ जूनला मालदीव, श्रीलंका दौऱ्यावर

पोलीसनामा ऑनलाइन टीम – मोदी २ सरकार स्थापन झाल्यावर मोदी पुन्हा विविध देशाचे दौरे करणार आहेत. यावेळी ते सत्तेत आल्यावर पहिल्यांदा मालदीव व श्रीलंका या देशांना भेटी देणार आहेत. ८ आणि ९ जून रोजी ते मालदीव, श्रीलंका दौऱ्यावर असतील.

शेजारील देशांपासून दौऱ्यांना सुरुवात केल्याने त्यांची प्राथमिकता ही शेजारील देशाशी चांगले संबंध निर्माण करण्यावर आहे असे दिसते. त्यांच्या या दौऱ्याबाबत विदेश मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. मोदी ९ जून ला श्रीलंकेच्या दौऱ्यावर असून ईस्टर सन्डे ला झालेल्या श्रीलंकेतील बॉम्ब हल्ल्यानंतर मोदी श्रीलंकेला एकजूटीचा संदेश देण्यासाठी जातील.

२०११ नंतर पंतप्रधान स्तरावर हा पहिलाच मालदीव दौरा असेल, या दौऱ्यात दोन्ही देश विभिन्न क्षेत्रात आपापसातील संबंध अजून घट्ट करण्यावर भर देतील. पंतप्रधान मोदींनी मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये राष्ट्रपती इब्राहिम सोलिह यांच्या शपथ विधी समारंभात सहभाग घेतला होता.

श्रीलंकेत ईस्टर सन्डेला झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटानंतर पहिल्यांदा कोणतरी विदेशी नेता श्रीलंकेला भेट देतील ते पंतप्रधान मोदीेंच असतील. मोदी एकजूटीचा स्पष्ट संदेश देण्यासाठी श्रींलकेला जाणार आहेत. असे देखील सांगण्यात येत आहे की मोदी श्रीलंकेतील राष्ट्रपती, पंतप्रधान आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या देखील भेटी घेतील.