PM मोदींच्या हस्ते गरीब कल्याण योजनेचा शुभारंभ ! कामगारांना दररोज 202 रुपये उत्पन्न मिळणार, ‘ही’ कामे केली जाणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गरीब कल्याण योजनेचा शुभारंभ झाला. 50 हजार कोटींची असणारी ही योजना लॉकडाऊनमध्ये घरी पोहोचलेल्या मजूरांसाठी महत्त्वाची आहे. या योजने अंतर्गत 25 हजार प्रवासी मजूरांना काम मिळणार आहेत. मुख्यमंत्री नितिश कुमार आणि उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांच्या उपस्थितीत व्हिडीओ कॉन्फन्सिंगच्या माध्यमातून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. खगडिया जिल्ह्यातील तेलिहार गावातून ही योजना लाँच करण्यात आली.

लॉकडाऊननंतर गावी पोहोचलेल्या मजूरांसाठी ही योजना आजपासून सुरु झाली आहे. याबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 18 जूनला माहिती दिली होती. प्रवासी मजुरांसाठी रोजगार उपलब्ध करून देणे हे या योजनेचे उद्दिष्ट असल्याचे यावेळी अर्थमंत्री म्हणाल्या होत्या. तसेच बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ओडिशा आणि राजस्थान या राज्यांमध्ये सर्वाधिक मजूर परतले आहेत. याठिकाणी 116 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक मजूर आले आहेत. त्यांच्या करता रोजगार या योजनेतून उपलब्ध करता येईल, असेही अर्थमंत्री म्हणाल्या होत्या.

अशी आहे योजना
या योजनेअंतर्गत 25 क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या जाणार आहेत. ज्यामध्ये ग्राम पंचायत भवन, विहिरींचे बांधकाम, अंगणवाडी, राष्ट्रीय महामार्गांची कामे यासारख्या एकूण 25 सेक्टर्सचा समावेश आहे. 125 दिवसांमध्ये ही योजना राबवण्यात येणार आहे. 116 जिल्ह्यांमध्ये ही योजना सुरु करण्याचा सरकारचा मानस आहे. जल जीवन मिशन, ग्राम सडक योजना यांसारख्या योजनांमध्ये प्रवासी मजूरांना देखील संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

या राज्यातील मजरूंना फायदा
या अभियानांतर्गत बिहारच्या 32, उत्तर प्रदेशच्या 31, मध्य प्रदेशचे 24, राजस्थानच्या 22, ओडिशामधील 4, झारखंडच्या 3 जिल्ह्यांमध्ये हीयोजना सुरु करण्यात येणार आहे. बिहारमधून या योजनेचा शुभारंभ झाला.

प्रवासी मजूर ‘ही’ कामे करतील
1. सार्वजनिक परिसराची स्वच्छता
2. ग्रामपंचायत भवन
4. राष्ट्रीय महामार्गाची कामे
5. जलसंधारण आणि जलसंचयाची कामे
6. विहिरींचे बांधकाम
7. वृक्षारोपणाची कामे
8. बागकाम
9. अंगणवाडी केंद्रांची कामे
10. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेची कामं
11. ग्रामीण रस्ता आणी सीमा रस्त्यांची कामं
12. भारतीय रेल्वे अंतर्गत येणारी कामं
13. श्यामा प्रसाद मुखर्जी शहरी मिशन
14. भारत नेट अंतर्गत फायबर ऑप्टिकल केबलिंगची कामं
15. पंतप्रधान कुसुम योजनेची कामं
16. वॉटर लाइफ मिशन अंतर्गत करण्यात येणारी कामं
17. पंतप्रधान ऊर्जा गंगा प्रकल्प
18. कृषी विज्ञान केंद्रांतर्गत रोजीरोटी प्रोजेक्ट
19. जिल्हा खनिज निधी अंतर्गत कामे
20. घन आणि द्रव्य कचरा व्यवस्थापनाची कामं
21. शेत तलाव योजनेची कामं
22. पशु शेड बनविणे
23. मेंढी/बकरीसाठी शेड बांधणे
24. पोल्टी शेड कन्स्ट्रक्शन
25. गांडुळ कंपोस्टिंग युनिट तयार करणे