…अन् PM मोदींनी CM केजरीवालांची चलाखी पकडली, मग दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना हात जोडून माफी मागावी लागली; जाणून घ्या नेमकं काय केलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक महत्वपूर्ण बैठक बोलवली होती. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाद्वारे या बैठकीत विविध राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित होते. बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदींनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वागणुकीबद्दल नाराजी व्यक्त करत अशा संवादाचा प्रचार आणि प्रसार केला जात नाही तुम्ही एक अतिशय नियमन (Protocol) मोडला आहात, अशा कठोर शब्दात पंतप्रधान मोदींनी अरविंद केजरीवाल याना सुनावल्याने त्यावेळी केजरीवाल यांनी गडबडून जाऊन हाथ जोडून मोदींची माफी मागितली आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बैठकीदरम्यान पंतप्रधानांशी बोलताना म्हणाले, दिल्लीमधील रुग्णालयांत ऑक्सिजनची कमतरता आहे. मला रोज यासाठी फोन येतात. मी काय करावं ? मी कोणाला फोन करावा? असे प्रश्न मुख्यमंत्री केजरीवाल यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुरू असलेल्या बैठकीत उपस्थित केले. मुख्यतः म्हणजे केजरीवाल हे बैठकीचे गुपित रेकॉर्ड करत होते. यावरून पंतप्रधान मोदी म्हणाले, तुम्ही करत असलेली कृती योग्य नाही. अशा स्वरुपाच्या बैठकीचं थेट प्रक्षेपण करणं योग्य नाही. आपल्याला कायम संयम ठेवायला हवा, तुमची कृती आपल्या परंपरेच्या, प्रोटोकॉलच्या विरुद्ध आहे. एखाद्या मुख्यमंत्र्यांनी अशा बैठकीचं थेट प्रक्षेपण करणं प्रोटोकॉलला धरून नाही, अशा कठोर शब्दात पंतप्रधान मोदींनी केजरीवाल यांची खरडपट्टी काढली आहे.

त्यावेळी मोदींनी केजरीवाल यांना सुनावल्यानंतर मुख्यंमत्री केजरीवाल यांनी आपली चूक झाल्याचं म्हटलं. ‘पुढील वेळेपासून मी याची काळजी घेईन. माझ्याकडून चूक झाली असेल, मी काही कठोरपणे बोललो असेन, तर मी त्यासाठी माफी मागतो,’ असं म्हणत केजरीवालांनी व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये हात जोडले आहेत. या दरम्यान, मुख्यमंत्री केजरीवाल व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमधील त्यांचा होणारा संवाद गुपित रेकॉर्ड करत होते. ही गोष्ट पंतप्रधान मोदींच्या लक्षात येताच त्यांनी याबाबत केजरीवालांना तीव्र शब्दांत सुनावलं आहे. त्यावेळी केजरीवालांना धक्काच बसला. केजरीवालांनी पंतप्रधानांसोबतचा संवाद केवळ रेकॉर्ड केला नाही. तर तो लीकदेखील केला. या प्रकारावरून भाजप आता केजरीवाल यांना लक्ष करीत आहे.