इरफान खानच्या निधनानंतर PM मोदींनी केलं ‘ट्विट’ !

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेता इरफान खान याच्या निधनानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलं आहे. पीएम मोदींनी म्हटलं आहे की, इरफान खानचं निधन म्हणजे सिनेमा आणि रंगमंचाच्या दुनियेसाठी एक मोठं नुकसान आहे. इरफानच्या निधनानं तर पूर्ण देश शोक व्यक्त करताना दिसत आहे. मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात त्यानं अखेरचा श्वास घेतला.

काय म्हणाले पीएम मोदी ?

पीएम मोदींनी ट्विट करत आपल्या भावना मांडल्या आहेत. पीएम मोदी म्हणाले, “इरफान खानचं निधन म्हणजे सिनेमा आणि रंगमंचाच्या दुनियेसाठी एक मोठं नुकसान आहे. विविध क्षेत्रातील त्यांच्या अष्टपैलू कामगिरीसाठी त्यांची आठवण येईल. आम्ही त्यांच्या मित्र, नातेवाईक आणि कुटुंब यांच्या सोबत आहोत. त्यांच्या आत्म्यास शांती देवो.”

याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही ट्विट केलं होतं. ते म्हणाले होते की, “इरफान खान यांच्या निधानामुळं दु:खी आहे. जगभर फेमस असणारे इरफान आपल्या फिल्म इंडस्ट्रीतील मोठी संपत्ती होते. देशानं एक असामान्य अभिनेता आणि दयाळु माणूस गमावला आहे.”

काँग्रेसच्या माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही ट्विट करत भावना मांडल्या होत्या.