PM Modi Visit To Pune | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील प्रमुख 10 मुद्दे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – PM Modi Visit To Pune | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांच्या हस्ते पुणे मेट्रोचे (Pune Metro) लोकार्पण आणि इतर प्रकल्पांचा शुभारंभ, पायाभरणी कार्यक्रम पार पडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आपल्या भाषणात शहरांच्या विकासाच्या अनुषगांचे पायाभूत सुविधांवर भर देण्याच्या आवश्यकता अधोरेखित करताना पर्यावरणपूरक धोरणाची आवश्यकता असल्याचे सांगितले. तसेच प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार (Central Government) प्रयत्नशील असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी (PM Modi Visit To Pune) सांगितले.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यात (PM Modi Visit To Pune) मुळा (Mula River), मुठा नदी (Mutha River) प्रकल्पांच्या पुनरुज्जीवन आणि प्रदूषण निवारण प्रकल्पाची (Pune River Rijuvenation Project) पायाभरणीही त्यांच्या हस्ते करण्यात आली. या प्रकल्पासाठी जवळपास 1100 कोटी रुपये खर्च अपेक्षीत असून पुणे महापालिकेच्या Pune Municipal Corporation (PMC) या प्रकल्पाला केंद्र सरकारकडून मदतीचा हात देण्यात येईल असेही मोदी यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

1. समाजातील सर्व घटनांनी मेट्रोने प्रवास करावा. मेट्रोतून प्रवास करणे तुम्ही स्वत:च्या शहराला एक प्रकारे मदत करत असतात.

2. येणाऱ्या काळात मेट्रो रेल्वेचे (Metro Railway) महत्त्व आणखी वाढणार आहे. देशभरात मेट्रोचे जाळं विस्तारत असून महाराष्ट्राचा (Maharashtra) मोठा वाटा आहे.

3. आधी भूमिपजून व्हायचं मात्र उद्घाटन (Inauguration) कधी होणार हे माहिती पडायचं नाही. मात्र, सध्याच्या काळात भूमिपूजन केल्यानंतर प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ शकतात.

4. पुण्याची ओळख ग्रीन फ्यूल सेंटर (Green Fuel Center) म्हणून निर्माण होत आहे.

5. पुणे शहरातील नागरिकांनी वर्षातून एकदा नदी उत्सव (River Festival) साजरा करावा. या मोहोत्सवात नदी प्रति असलेली श्रद्धा व्यक्त करता येईल. त्याशिवाय नदी, पर्यावरणाचे महत्त्व आदीचे सांगता येईल. यानिमित्ताने जनजागृती मोहीम राबवता येईल

6. 21 व्या शतकातील शहरांच्या गरजा आणि विकास लक्षात घेऊन सरकार धोरण आखत आहे. सरकार अधिकाधिक ई-वाहनांच्या (E-Vehicles) वापरासाठी प्रोत्साहन देत आहे.

7. अत्याधुनिक पद्धतीने घनकचरा व्यवस्थापन (Solid Waste Management), सांडपाणी प्रक्रियेची व्यवस्था (Sewage Treatment System), बायोगॅस प्लांट (Biogas Plant), स्मार्ट एलईडी बल्बचा (Smart LED Bulb) अधिक वापर व्हावा यासाठी धोरणांवर सरकार कम करत आहे.

8. परदेशातील कच्चा तेलाचे (Crude Oil) अवलंबित्व कमी करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. याचाच एक भाग म्हणून इथेनॉलचा (Ethanol) वापर वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे.

9. या धोरणामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल.

10. सरकारांमधील समन्वयाच्या अभावी योजना रखडतात. या योजना पूर्ण होतात तेव्हा तेव्हा त्या कालबाह्य झालेल्या असतात. पीएम नॅशनल गती योजना (PM National Speed Plan) प्रकल्प वेळेवर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार. प्रकल्प वेळेवर पूर्ण होणे आवश्यक.

 

Web Title :- PM Modi Visit To Pune | pm narendra modi speech key highlights points in pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

BCCI Announces Schedule For TATA IPL 2022 | आयपीएलचं बिगुल वाजलं ! ‘या’ तारखेपासून रंगणार आयपीएलचा रणसंग्राम; वाचा सविस्तर

 

Pune Crime | खून झालेल्या मुलाच्या 16 लाखांच्या दागिन्यांचा अपहार करणार्‍यास अटक

 

Pune Crime | पुणे पोलिसांना गुंगारा देणार्‍या गुंडाला कोल्हापूरात अटक; क्रिकेटच्या सामन्यात वेशांतर करुन मख्खनसिंह अजितसिंग कल्याणीला पोलिसांनी केले जेरबंद