PM Modi Visit To Pune | छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – PM Modi Visit To Pune | छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) सिंहासनाधिष्ठित पुतळ्याचे अनावरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुणे महानगरपालिका Pune Corporation (PMC) येथे करण्यात आले (PM Narendra Modi Unveils Statue Of Chhatrapati Shivaji Maharaj In Pune). या पुतळ्याची उंची सुमारे ९.५ फूट इतकी आहे. (PM Modi Visit To Pune)

 

यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol) यांनी प्रधानमंत्री मोदी यांचे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन स्वागत केले. (PM Modi Visit To Pune)

 

यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale), उद्योग मंत्री सुभाष देसाई (Subhas Desai), नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis), खासदार छत्रपती उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale), महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सुनीता वाडेकर (Deputy Mayor Sunita Wadekar), स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने (Hemant Rasne), गणेश बिडकर (Ganesh Bidkar), विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ (PMC Leader of Opposition Deepali Dhumal),पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रमकुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

 

प्रारंभी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी थोर समाजसुधारक महात्मा जोतिराव फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

कोथरूड येथील संस्कृती प्रतिष्ठानने (Sanskriti Pratishthan Kothrud) छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनाधिष्ट पुतळा महापालिकेला दिला आहे. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी शाल व विशेष तयार करून घेतलेला फेटा घालून तसेच शिवप्रतिमा देऊन मोदी यांचे स्वागत केले.

दरम्यान 1961 ला पानशेत पुराच्यावेळी (Panshet Flood 1961) पाहणी करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु (Pandit Jawaharlal Nehru) पुणे महापालिकेत (PMC) आले होते. त्यानंतर महापालिकेत आलेले मोदी हे दुसरेच पंतप्रधान ठरल्याने महापालिकेच्या दृष्टीने हा ऐतिहासिक क्षण ठरला आहे.

क्षणचित्रे

* महापालिका भवन येथे आल्यानंतर सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्प वाहून अभिवादन केले.

Advt.

* यानंतर छत्रपत्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे रिमोट कंट्रोलद्वारे अनावरण केले. छत्रपतींना नमन केले.

* महापौर मुरलीधर मोहोळ यांनी शाल, पगडी आणि शिवप्रतिमा देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले.

* कार्यक्रमाला उपस्थित नगरसेवक, नगरसेविका आणि अधिकाऱ्यांना अभिवादन केले.

 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोचं (Pune Metro) देखील उद्घाटन झालं आहे.
इतर विकास कामांचे देखील मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), पुण्याचे खासदार गिरीश बापट (MP Girish Bapat) पुणे भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik), प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar), आमदार माधुरी मिसाळ (MLA Madhuri Misal), आमदार सुनिल कांबळे (MLA Sunil Kamble),
भाजपचे राजेश पांडे (BJP Rajesh Pandey) यांच्यासह पुण्यातील भाजप आमदार आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

 

Web Title :- PM Modi Visit To Pune | PM Narendra Modi Unveils Statue Of Chhatrapati Shivaji Maharaj In pune municipal corporation (pmc)

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा