PM Modi Visit To Pune | ‘पूर्वी भूमिपूजन व्हायचे पण लोकार्पणाची शाश्वती नव्हती’, PM मोदींचा काँग्रेसवर निशाणा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – PM Modi Visit To Pune | पुणे मेट्रोसह (Pune Metro) पुण्यातील विविध उपक्रामांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याहस्ते करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान महत्त्वाकांशी अशा पुणे मेट्रोच्या गरवारे महाविद्यालयाजवळ (Garware College) मार्गिकेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून (Marathi) केली. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात बोलताना पूर्वी भूमिपूजन तर व्हायचे, लोकार्पण याची शाश्वती नव्हती, असे म्हणत काँग्रेसवर (Congress) निशाणा साधला. (PM Modi Visit To Pune)

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आपल्याकडे महत्वाच्या योजना पूर्ण व्हायला देखील फार वेळ लागायचा. या सुस्त वृत्तीमुळे देशाचं मोठं नुकसान झालं. आता आपल्याला वेगाने काम करायला हवं. यासाठी सरकारने पीएम गतिशक्ती नॅशनल मास्टर प्लान (PM Gatishakti National Master Plan) बनवला आहे. सरकार, मंत्रालयांमध्ये ताळमेळ नसल्यामुळे अनेक वर्षानंतर एखादी योजना जरी पूर्ण झाली, तरी ती आऊटडेटेड झालेली असते. पीएम गती शक्ती मास्टर प्लान यावरच काम करेल.

 

नद्या जर पुन्हा जिवंत झाल्या, तर शहरातल्या लोकांना देखील दिलासा मिळेल. शहरातल्या लोकांनी वर्षातला एक दिवस निश्चित करुन नदी उत्सव साजरा करायला हवा. संपूर्ण शहरात नदी उत्सवाचं (River Festival) वातावरण निर्माण करायला हवं. तेव्हा कुठे आपल्याला आपल्या नद्यांचं महत्त्व समजेल.

भाषणाची सुरुवात मराठीतून
छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj), महात्मा ज्योतिबा फुले (Mahatma Jyotiba Phule),
सावित्रीबाई फुले (Savitribai Phule), महर्षी कर्वे (Maharshi Karve) यांच्यासह अशा अनेक प्रतिभाशाली साहित्यिक,
कलाकार, समाजसेवकांच्या वास्तव्याने पावन झालेल्या पुण्यनगरीतील माझ्या बंधु-भगिनींना नमस्कार!

 

Web Title :- PM Modi Visit To Pune | pm narendra modi visit pune metro rail inauguration and other projects

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar | थेट PM मोदींना सांगत अजित पवारांचा व्यासपीठावरुन राज्यपालांना सणसणीत टोला (व्हिडीओ)

 

Beed Crime | भीषण अपघातात मंडळ अधिकारी ठार; बीडचे तहसीलदार, एक कर्मचारी जखमी

 

LIC Saral Pension Plan | केवळ एकदा पैसे भरल्यानंतर मिळेल 12000 रुपये महिना पेन्शन, इतके पैसे करावे लागतील जमा