PM Modi Visit To Pune | चर्चा तर होणारच! PM मोदींच्या कार्यक्रमात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस आले एकाच व्यासपीठावर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – PM Modi Visit To Pune | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांच्या हस्ते पुणे मेट्रोचे (Pune Metro) लोकार्पण आणि इतर प्रकल्पांचा शुभारंभ, पायाभरणी कार्यक्रम पार पडला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे बऱ्याच दिवसांनी एकाच व्यासपीठावर (Stage) आले. त्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात व्यासपीठावर गप्पा रंगल्या होत्या. त्यामुळे राजकीय चर्चांना (PM Modi Visit To Pune) उधाण आले आहे.

 

पतंप्रधान नरेंद्र मोती यांच्या हस्ते (PM Modi Visit To Pune) पुणे मेट्रोचा (Pune Metro) लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. विशेष म्हणजे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे एकमेकांच्या शेजारीच बसले होते. यावेळी दोन्ही नेत्यांकडे व्यासपीठावर चर्चा रंगली होती. एकीकडे महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांच्यामागे ईडीचा (ED) ससेमिरा लागला आहे. तर दुसरीकडे भाजपचे नेते सरकार पाडण्याच्या तारखा देत आहेत. त्यातच फडणवीस आणि अजित पवार यांच्या चर्चा रंगल्यामुळे नेमकं काय म्हणाले असतील, अशी राजकीय चर्चा रंगली आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
– पुण्याकरता आज स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. आज पंतप्रधान यांनी मेट्रो प्रवास केला, त्यांनी तिकीट काढून प्रवास केला.

– महामेट्रोने (Maha Metro) विक्रमी वेळेत मेट्रोचे काम केले आहे. पुणे मेट्रोने नवीन मॉडेल देशाला दिले आहे.

– जायका प्रकल्प (JICA Project ) सुरु होतोय. स्वच्छ नदी लवकरच आपल्याला पाहायला मिळेल. ई-बसचा (E-Bus) मोठा ताफा आला आहे आणि 100 टक्के इंधन मुक्त गाड्या येतील.

 

काय म्हणाले अजित पवार ?
– अनेक वर्षे इच्छा होती की ही विकास काम लवकर व्हावी या भूमिपूजन उद्घाटन कार्यक्रमाला पंतप्राधन उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे आभार.

– नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) ज्यांना आदर्श मानतात त्याच शिवाजी महाराज यांची भूमि, छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj)
यांचा वारसा पुढे नेण्याचे काम आम्ही करतोय. तुम्ही आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद.

– मला पंतप्रधान यांना लक्षात आणून द्यायचं आहे की काही मान्यवर व्यक्तीकडून अनावश्यक वक्तव्य केली जात आहेत.
ते महाराष्ट्राला परवडणारे नाही, त्यामुळे याकडे लक्ष द्यावे.

 

Web Title :- PM Modi Visit To Pune | pm narendra modis pune visit ajit pawar devendra fadnavis came on same platform

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Amol Kolhe | राज्यपालांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणं गरजेचं होतं, अजित पवारांनी ते काम केलं – अमोल कोल्हे

 

AAP On PM Modi Visit To Pune | ‘आम आदमी’ची गांधीगिरी ! मोदीजी, तुम्ही नेहमीच पुण्यात या, त्या निमित्ताने रस्ते सुधारतील इथले’

 

Coronavirus in Maharashtra | मोठा दिलासा! राज्यात दैनंदिन रुग्णसंख्या पाचशेच्या आत, जाणून घ्या इतर आकडेवारी