PM Modi Visit To Pune Mahapalika Bhavan | पंतप्रधान महापालिका भवनमध्ये येणार पण ‘या’ कारणामुळं सत्ताधारी भाजपसह अनेक नगरसेवकांचा ‘हिरमोड’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – PM Modi Visit To Pune Mahapalika Bhavan | रविवारी (दि. ६ मार्च) पुण्यात मेट्रोच्या उदघाटनासह विविध प्रकल्पांच्या भुमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पुणे दौर्‍यावर येणार आहेत. यावेळी ते महापालिका भवनच्या (Pune Mahapalika Bhavan) आवारात उभारण्यात येणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याचे देखिल अनावरण करणार आहेत. परंतू या कार्यक्रमाच्यावेळी सुरक्षिततेच्या कारणास्तव पोलिस (Pune Police) आणि एसपीजी सुरक्षा व्यवस्थेने (SPG Security) जेमतेम २५ जणांनाच उपस्थित राहण्याची परवानगी दिल्याने सत्ताधारी भाजपच्याच नगरसेवकांसह पदाधिकार्‍यांचा हिरमोड (BJP Corporators & BJP Office Bearers) झाला आहे. (PM Modi Visit To Pune Mahapalika Bhavan)

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महापालिका भवनच्या आवारात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol) हे सदस्य असलेल्या संस्कृती प्रतिष्ठानने (Sanskriti Pratishthan) महापालिकेला हा पुतळा भेट दिला आहे. अवघ्या तीन दिवसांवर आलेल्या या कार्यक्रमाच्या तयारीसाठी महापालिका यंत्रणा अहोरात्र झटत असून पोलिस आणि केंद्रीय सुरक्षा व्यवस्थेनेही मागील तीन ते चार दिवसांपासून येथे तळ ठोकला आहे. आज राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश शेठ (DGP Rajnish Seth) यांच्यासह वरिष्ठ अधिकार्‍यांनीही येथील कार्यक्रमांच्या सुरक्षा व्यवस्थेची स्वत:ह जातीने पाहणी करून आढावा घेतला. (PM Modi Visit To Pune Mahapalika Bhavan)

दरम्यान रविवारी हा कार्यक्रम असल्याने महापालिकेला सुट्टीच आहे.
परंतू सुरक्षा व्यवस्थेचे कारण देत कार्यक्रम स्थळी फक्त २५ जणांनाच प्रवेश देण्यात येईल,
अशी भुमिका केंद्रीय सुरक्षा व्यवस्था आणि राज्य पोलिसांनी घेतली आहे.
यामुळे सत्ताधारी भाजपची गोची झाली आहे.
पुण्यात भाजपचे दोन खासदार, सहा आमदार आणि जवळपास १०० नगरसेवक आहेत.
तसेच संघटनात्मक पदांवरही अनेकजण आहेत.
दुसरीकडे महापालिकेचा कार्यक्रम असल्याने महापालिकेतील पदाधिकारी, राज्यातील मंत्री, वरिष्ठ अधिकारी व अत्यावश्यक कामांसाठीच्या स्टाफलाही प्रोटोकॉलनुसार उपस्थित राहावे लागणार आहे.
अशा परिस्थितीत फक्त २५ जणांना उपस्थित राहाण्याचे बंधन घातल्याने गाळायचे कोणाला ? असा प्रश्‍न सत्ताधार्‍यांपुढे निर्माण झाला आहे.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान महापालिकेत येणार असतानाही उपस्थित राहता येणार नसल्याची खंत भाजपचे नगरसेवक (Pune BJP Corporator) व्यक्त करत आहेत.

 

यासंदर्भात महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे विचारणा केली असता,
ते म्हणाले महापालिका भवनच्या आवारातील कार्यक्रमाला किमान २०० जणांना उपस्थित राहता यावे यासाठी पोलिस दल आणि केंद्रीय सुरक्षा दलाला विनंती करण्यात येत आहे.
येत्या एक दोन दिवसांत त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे.

 

Web Title :- PM Modi Visits To Pune Mahapalika Bhavan | The Prime Minister Narendra Modi will come to Pune Mahapalika Bhavan but due to this reason many corporators including the ruling BJP are offset

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा