उद्या सकाळी 9 वाजता PM नरेंद्र मोदी खास ‘संदेश’ देणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना व्हायरसचा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशामध्ये 21 दिवसांचा म्हणजे 14 एप्रिलपर्यत लॉकडाऊन करण्याची घोषणा केली. अशातच पुन्हा एकदा नरेंद्र मोदी हे देशाला संबोधित करणार आहेत. पण यावेळी ते एका नव्या वेळेत देशातील जनतेशी संवाद साधणार आहेत. नोटबंदी असो किंवा लॉकडाऊन पंतप्रधान मोदी यांनी नेहमीच रात्री 8 वाजता देशाला संबोधित केले आहे. पण यावेळी ते सकाळी 9 वाजता देशातील नागरिकांना खास मेसेज देणार आहेत.

उद्या (शुक्रवारी) सकाळी 9 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला एका छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून देशातील जनतेशी संपर्क साधणार आहेत. यासंबंधी ट्विट करत मोदींनी माहिती दिली आहे. मोदी यावेळी नेमकं काय बोलणार याकडे सर्व देशवासियांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, कोरोनाच्या या धोक्यापासून वाचण्यासाठी मोदी वारंवार जनतेशी संवाद साधत आहेत. काही दिवसांआधी त्यांनी फोनद्वारे मन की बात यामधून देशातील जनतेशी संवाद साधला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील सर्व राज्यांच्या मख्यमंत्र्यांशी आणि केंद्र शासित प्रदेशांच्या प्रशासकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. यावेळी त्यांनी प्रत्येक राज्यातील कोरोना व्हायरसच्या सद्य परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी महाराष्ट्र, मिझोरम, दिल्ली, बिहार, तलंगणा, पुडुचेरी, गोवा, त्रिपुरा, उत्तराखंड, मेघालय, हिमाचल प्रदेश या मुख्यमंत्र्यांसह राज्यांचे इतर राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्र शासित प्रदेशांचे प्रशासकांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधानांशी चर्चा केली. त्यामुळे या चर्चे नंतर शुक्रवारी सकाळी 9 वाजता पंतप्रधान मोदी काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.