‘या’ मठात अकबरपासून औरंगजेबापर्यंत अनेकांनी लिहिले ‘फरमान’, PM मोदी पहिल्यांदाच घेतायत ‘दर्शन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काशी भगवान शंकराची भूमी समजली जाते. यात काशीच एक असे मठ आणि मंदिर आहे जेथे शिवालय आहे. याच शिवालयात 16 फेब्रुवारीला पंतप्रधान मोदी आपल्या वाराणसी दौऱ्यावर असताना दर्शन घेण्यासाठी येणार आहेत. या शिवालयाला धार्मिक आणि सामाजिक महत्व आहे. तसेच येथे 6 व्या शतकातील एक ऐतिहासिक ताम्रपत्रावर मुस्लिम शासन काळातील इतिहास नोंदवलेला आहे. वाराणसीत पोहचल्यावर पंतप्रधान मोदी याच मठात जाऊन दर्शन घेतील. तेथे ते 1400 वर्षापासून जारी फरमान संग्रहाचे अवलोकन करतील. तसेच श्रीसिद्धांत शिखामणि नामक दार्शनिक ग्रंथाचे विमोचन करतील. यानंतर श्री सिद्धांत शिखामणि नावाचे अ‍ॅप देखील पंतप्रधान मोदी लॉन्च करतील.

बनारसच्या गोदोलिया परिसरात 5000 वर्गमीटर पसरलेला जंगमवाडी मठ आहे. या मठात प्रवेश केल्यावर छोटे मोठे अनेक शिवलिंग आहेत. आज तागायत याची मोजणी करता आली नाही. येथील जे लोक आहेत त्यांच्या गळ्यात चांदीचे एक मोठे लॉकेट असेल. त्यांच्या आत देखील शिवलिंग आहे. मठापासून मंदिरापर्यंत जागोजागी फक्त शिवलिंग आहेत.

जंगमवाडी मठाचा इतिहास –
दावा केला जातो की 5 व्या शतकात काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंगातून जगतगुरी विश्वाराध्य जी प्रकट झाले होते. ज्यांनी या मठाची स्थापना केली. तर शिवलिंगची स्थापना विश्वाराध्य गेल्यावर झाली. जी आज देखील सुरु आहे. त्यानंतर राजा जयचंद यानी ही जागा दान केली आणि त्यानंतर याचा निर्माण झाला. जंगमवाडी मठाचे आतापर्यंत 86 जगतगुरु राहिले आहेत. सध्या चंद्रशेखर शिवाचार्य महाराज मठाचे जगतगुरु आहेत.

या संप्रदाय मानत नाही पुनर्जन्म –
मंदिर प्रबंधक म्हणाले की येथे लाखोच्या संख्येने जेव्हा शिवलिंग बाहेर आले तेव्हा सर्वांना जमिनीवर एका जागी वर ठेवून विश्वनाथ रुप मंदिर तयार करण्यात आले. मठात अनेक गुरुंची जिवंत समाधी आहे. या मठाशी संबंधित लोक वीर शैव संप्रदायाचे आहेत. पूजा पठन, भक्ती सामान्यता हिंदू पद्धती प्रमाणे आहे परंतु या संप्रदायाशी संबंधित लोक पुनर्जन्मावर विश्वास ठेवत नाहीत.

मृत्यूनंतर दफनाची पद्धत –
महाराष्ट्र, कर्नाटक, ओडिसासह अनेक राज्यात या संप्रदायाचे लोक आहेत, जे पूर्वाजांच्या मुक्तीसाठी पिंडदानाच्या ऐवजी शिवलिंग स्थापित करतात. तर कोणाच्याही मृत्यूनंतर मृतदेह दफन करण्याची परंपरा या संप्रदायात आहे. त्यात स्थळी शिवलिंग तयार करुन 5 दिवस त्याची पूजा केली जाते आणि काशीत येऊन त्यांच्या नावे शिवलिंग स्थापन केले जाते. दरवर्षी येथे येऊन पूजन आणि भोज केला जातो.

पूर्वजांची शिवलिंगाच्या रुपात विशेष पूजा –
शिवलिंगाचे रेकॉर्ड ठेवले जाते, त्यांच्या पुण्यतिथीला त्यांच्या नावे पूजा केली जाते. मठात विशेष करुन कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरात, राजस्थान, छत्तीसगढ, हरियाणा इत्यादी प्रांतातील लोक येतात. वीर शैव संप्रदायाचे देशभरात पाच पीठ आहेत.

गर्भवती महिलांना देखील बांधले जाते शिवलिंग –
मठात पूर्वजांसाठी 2 इंचाचे शिवलिंग दिले जाते. 125 रुपयात मठात शिवलिंग स्थापन केले जाते. जेव्हा महिला 5 महिन्यांच्या गर्भवती असतात तेव्हा त्यांच्या कमरेत मुलांच्या रक्षणासाठी शिवलिंग बांधले जाते. मुलांच्या जन्मानंतर काही महिन्यांनी तेच शिवलिंग मुलाच्या गळ्यात बांधले जातात. आई दुसरे शिवलिंग धारण करते, जे आयुष्यभर त्यांच्या सोबत राहते. मुलांचे नामकरण जो कोणी गुरु करतो, तो शिवलिंगाची पूजा करुन पुन्हा गळ्यात बांधतो, जे शिवलिंग व्यक्तीच्या अखेरच्या श्वासापर्यंत त्याच्यासोबत राहते.

एका छताखाली 15 लाख पेक्षा जास्त शिवलिंग –
शतकानुशतकांच्या या परंपरेमुळे एकाच छताखाली 15 लाख पेक्षाजास्त शिवलिंग स्थापित आहेत. येथे संप्रदायातील लोक पूर्वजांच्या मुक्तिसाठी शिवलिंग स्थापित करतात. मठामध्ये जे शिवलिंग आहेत ते तेथील गुरु, आचार्य, शिक्षापात्र लोकांचे आहेत आणि मंदिराच्या छताखाली संप्रदायातील सामान्य लोकांचे आहेत.

सावन आणि महाशिवरात्रीला विशेष आयोजन –
मंदिराच्या खाली लाखो शिवलिंग ठेवण्यात आले आहे. शिवरात्रीच्या दिवशी लोक शिवलिंगाच्या स्वरुपात ठेवलेल्या आपल्या पितरांची विशेष पुजा करतात. येथे पूर्वजांची शिवलिंग स्थापन करण्याचा मुहूर्त नाही.

मठाबाबत काही विशेष बाबी –
मठात 1400 वर्ष जुना ऐतिहासिक दस्तावेज आहे. हिंदू आणि मुस्लिम शासकांकडून विविध कालखंडमध्ये जंगमवाडी मठाला देण्यात आलेल्या दानाचे फरमान आहे.

सर्वात जुने दानपत्र 6 व्या शताब्दीमधील आहेत जे नरेश महाजात जयचंद्र यांच्या काळातील आहे.

दुसरे फरमान 1076 चे आहे. बाकी चार फरमान अकबर, तीन औरंगजेब आणि दोन दोन दाराशिकोह आणि शाहजहा यांचे तर एक फरमान जहांगीर यांच्याकडून जारी करण्यात आला आहे.

मठात अनेक पीठाधिश्वरांची समाधी आहेत, ज्यात स्वामी विश्वाराध्य महाराज, स्वामी मलिकार्जुन, हरिश्वर शिवाचार्य, राजेश्वर शिवाचार्य, शिवलिंग शिवाचार्य, पंचाक्षर शिवाचार्य, वीरभद्र शिवाचार्य, विश्वशेश्वर शिवाचार्य इत्यादींचा समावेश आहे.

कर्नाटकचे हेलेरी डायनेस्टी ऑफ कोडगु स्टेटचे राजा चिकवीरा राजेंद्र आणि त्यांच्या कुटूंबाचे देखील मठात शिवलिंग स्वरुप स्थापित आहे, लंडनच्या राज्याचा निधनानंतर 1862 मध्ये मठ परिसरात त्यांची समाधी स्थापित करण्यात आली होती. परंपरेनुसार त्यांच्या नावाचे शिवलिंग देखील येथे स्थापित आहे. यानंतर तीन राण्या, देवाम्माजी, गंगाम्माजी आणि नजम्माजी यांच्याशिवा राजकुमार लिंग राजेंद्र वडीयर यांच्या नावचे शिवलिंग देखील स्थापित आहे.

You might also like