PM मोदींनी साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ! म्हणाले- ‘Dear…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड पासून तर हॉलिवूड पर्यंत आपल्या अभिनयाचा डंका वाजवणाऱ्या साऊथ सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांचा आज (शनिवार, दि 12 डिसेंबर) 70 वा वाढदिवस साजरा करत आहे.

आज वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. चाहते, सेलेब्स आणि अनेक नेत्यांनीही त्यांना बर्थडे विश केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही रजनीकांत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पीएम मोदींनी ट्विट करत आपल्या भावना मांडल्या आहेत. आपल्या ट्विटमध्ये मोदी म्हणतात, डिअर रजनीकांतजी तु्म्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुम्हाला निरोगी आणि दीर्घायुष्य लाभावं.

रजनीकांत यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर साऊथसोबतच बॉलिवूडमध्ये त्यांनी अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. अंधा कानून हा त्यांचा बॉलिवूडमधील पहिला सिनेमा होता. पहिल्या सिनेमात त्यांनी असं काम केलं की, बिग बी आणि हेमा मालिनी अशा स्टार्सलाही ते सरस वाटू लागले. चालबाज हा त्यांचा बॉलिवूडमधील दुसरा हिट सिनेमा होता. यानंतर त्यांनी जे काही सिनेम केले त्यानंतर ते मोठे स्टार म्हणून उदयास आले. त्यांनी रोबोट, 2.0, बाबा, बुलंदी, आगाज, क्रांतिकारी, आतंक ही आतंक, इंसानियत के देवता, त्यागी, दलपति, फूल बने अंगारे, हम, खून का कर्ज, फरिश्ते असे अनेक सिनेमे करत त्यांनी लोकांचं मन जिंकलं.