पहाटे योगा करून PM नरेंद्र मोदी यांनी सांगितले त्याचे ‘महत्व’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पोलीस महासंचालकांच्या तीन दिवसीय परिषदेसाठी काल येथे मुक्कामी असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहाटे उठून योगा आणि व्यायाम केला. त्यावेळी अधिकारी आणि उपस्थितांना त्याचे महत्त्व ही पटवून दिले.

पाषण रोडवरील आयसर संस्थेत देशपातळीवरील पोलीस महासंचालक यांची तीन दिवसीय परिषद आहे. त्यानिमित्त नरेंद्र मोदी हे शुक्रवारी रात्री पुण्यात आले आहेत. राजभवनात ते मुक्कामी आहेत. दरम्यान त्यांनी नेहमी प्रमाणे पहाटे उठून आयसर संस्थेत जाऊन योगा, ध्यानधारणा आणि व्यायाम केला. त्यानंतर उपस्थित असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही योगाचे महत्व पटवून दिले.

देशासह परदेश दौऱ्यावर असतानाही मोदी योगा आणि व्यायामाला प्राधान्य देतात. निरोगी आयुष्यामध्ये योगाचे सर्वाधिक महत्व असल्याचे त्यांनी अनेकवेळा भाषणांमधून सांगितले आहे. देश-विदेशामध्ये त्यांनी योगाचा प्रचार व प्रसारावरही भर दिला आहे. विशेषतः योगा करण्यासाठी ते सहकाऱ्यानाही प्रेरित करतात.

Visit : Policenama.com

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like