पंतप्रधान मोदींच्या भावाचं पोलीस स्थानकाबाहेरच आंदोलन

जयपूर : पोलीसनामा ऑनलाईन – पंतप्रधान मोदींचे भाऊ प्रल्हाद मोदी यांना उदयपूर ते जयपूर प्रवासादरम्यान पोलिसांनी एस्कॉर्ट वाहन पुरविले नसल्याने त्यांनी चक्क पोलीस स्थानकाबाहेरच आंदोलन केलं. बगरू पोलिसांनी त्यांना एस्कॉर्ट सुरक्षा नाकारली होती. त्यानंतर पोलीस स्थानकाबाहेर भाजप कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती.

प्रल्हाद मोदींनी पोलिसांकडे स्वतंत्र पीएसओ (पर्सनल सिक्यूरिटी ऑफिसर) देण्याची मागणी केली होती. तसेच त्यांना आपल्या गाडीत बसविणार नाही. असे म्हणत त्यांच्यासाठी स्वतंत्र गाडी द्यावी अशी मागणी केली. मात्र पोलिसांनी त्यांना नियम दाखविल्यावर त्यांनी आपले आंदोलन थांबविले.

प्रल्हाद मोदी म्हणाले, मला उदयपुर ते जयपूर असा ३० किलोमीटरचा प्रवास मंगळवारी करायचा होता. मी कुठेही जातो तेव्हा मला तेथील राज्य सरकार एस्कॉर्ट वाहन पुरविते. परंतु जयपूरच्या पोलीस आयुक्तांना माझी किंवा नरेंद्र मोदींची काहीतरी अडचण असावी. त्यामुळे त्यांनी मला स्वतंत्र एस्कॉर्ट वाहन देण्यास नकार दिला आहे. पोलीस आयुक्तांनी केवळ दोन पोलीस माझ्यासोबत दिले. त्यानंतर माझ्याच गाडीतून त्यांना प्रवास करण्यास सांगण्यात आले. यावेळी माझ्यासोबत माझे कुटुंब होते. माध्यासोबत २ पर्सनल सिक्यूरिटी ऑफिसर्स द्यावेत अशी मागणी केली होती. मात्र यावर पोलीस आयुक्त आनंद श्रीवास्तवयांनी मलाच स्पष्टीकरण दिले.

तर पोलीस आयुक्त श्रीवास्तव म्हणाले, बागरू पोलीस ठाण्यात २ पोलीस प्रल्हाद मोदींची वाट पाहात उभे होते. त्यावेळी नियमानुसार त्यांना मोदी यांच्या गाडीतूनच प्रवास करावा लागतो. मात्र त्यांनी पीएसओंना गाडीत घेण्यास नकार दिला. पीएसओंना स्वतंत्र वाहन देण्याची मागणी केली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like