राष्ट्रपती कोविंद, उपराष्ट्रपती नायडू आणि PM मोदींसाठी येत आहेत 2 ब्रॅन्ड न्यू बोइंग 777 विमान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशाच्या राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या विमानात आता अत्याधुनिक मिसाइल डिफेंस सिस्टम लावण्यात येईल आणि त्याला एअर इंडियाचे वैमानिक नाही तर एअरफोर्सचे वैमानिक चालवतील. सरकारी विमान कंपनी एअर इंडिया भारतीय वायुसेनेच्या वैमानिकांना नव्या बोइंग 777 विमान उड्डाणाचे प्रशिक्षण देखील देत आहे. पीएम मोदींसह देशातील टॉप नेतृत्व करणारे नेते जुलै 2020 पासून बी 777 विमानातून प्रवास करतील.

देखभाल करणार एअर इंडिया
अमेरिकन प्लॅन्टमध्ये तयार होत असलेल्या अमेरिकी बी 777 विमान लार्ज एअरक्राफ्ट इन्फ्रारेड काउंटर मेजर्स आणि सेल्फ प्रॉटेक्शन सूट्स पायलट्स एअर इंडियाने समृद्ध असणार आहे, ही विमाने जुलै 2020 साली भारतात येतील. असे पहिल्यांदा होईल की याचे वैमानिक एअर इंडियाचे नसतील. यातील वैमानिक बदलले तरी व्यवस्थापन आणि देखभाल टीम एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेज लिमिटेडकडेच असेल. याशिवाय विमानात आतासारखेच एअर इंडिया क्रूच सेवा प्रदान करेल.

4 – 6 वैमानिकांना प्रशिक्षण
सध्या बी 777 विमान उडवण्याचे प्रशिक्षण एअर इंडियाचे वैमानिक वायु सेनेच्या वैमानिकांना देत आहेत हे प्रशिक्षण कलीना ट्रेनिंग सेंटर मध्ये सुरु आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की 4-6 वैमानिकांना हे प्रशिक्षण देण्यात येत आहे.

एअर इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की वायुसेनेचे वैमानिक प्रशिक्षित आहेत. परंतू हे वैमानिक लढावू विमान उडवण्यात विशेषज्ञ आहेत. परंतू नव्या बोइंग 777 विमान याचा वापर व्हीआयपी प्रवासासाठी केला जातो. ते कर्मशल प्रकारचे एअरक्राफ्ट आहेत. यामुळे त्यांना कर्मशल एअरक्राफ्टचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.

जुलै 2020 पासून सेवेत
सध्या पंतप्रधान मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती वेंकैया नायडू यांच्यासाठी एअर इंडियाकडे बोइंग 747 विमान आहे. या विमानाला एअर इंडिया वन नाव देण्यात आले आहे. याला एअर इंडियाचे वैमानिक चालवत आहेत. जेव्हा याचा वापर व्हीआयपी व्यक्तीसाठी होत नसतो तेव्हा एअर इंडिया याचा वापर प्रवाशी वाहनाप्रमाणे करते. परंतू जुलै 2020 पासून व्हीआयपींसाठी नव्या बोइंग 777 चा वापर करेल. नव्या विमानाचा वापर फक्त व्हीआयपी व्यक्तींसाठी करण्यात येईल.

visit : policenama.com