Amarjeet Sinha Resign | PMO कार्यालयातील आणखी एका वरिष्ठ IAS अधिकाऱ्याचा राजीनामा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  पंतप्रधान कार्यालयातील (PMO) वरिष्ठ अधिकारी असलेले अमरजित सिन्हा यांनी आपल्या पदाचा राजीनामा (Amarjeet Sinha Resign) दिला आहे. सूत्रांनी सोमवारी (दि.2) ही माहिती दिली आहे. सेवानिवृत्त IAS अधिकारी अमरजित सिन्हा हे पंतप्रधान कार्यालयात सल्लागार (special advisor) होते. सामाजिक क्षेत्रासंबंधिच्या योजनांची जबाबदारी त्यांच्याकडे होते. अमरजित सिन्हा (Amarjeet Sinha Resign) यांनी राजीनामा देण्यापूर्वी पी.के. सिन्हांनी राजिनामा दिला होता.

अमरजित सिन्हा हे बिहार कॅडरचे 1983 च्या बॅचचे आयएएस अधिकारी होते. सिन्हा हे 2019 मध्ये ग्रामसचिव पदावरुन सेवानिवृत्त झाले होते.
अलिकडच्या काही महिन्यांत पंतप्रधान कार्यालयातून राजीनामा देणारे ते दुसरे वरिष्ठ अधिकारी आहेत.
यापूर्वी मार्चमध्ये पंतप्रधान कार्यालयातील मुख्य सल्लागार आणि माजी कॅबिनेट सचिव पी.के. सिन्हा (P.K. Sinha) यांनी राजीनामा दिला होता.

गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये अमरजित सिन्हा यांच्यासह भास्कर खुळबे (Bhaskar Khulbe) यांना पंतप्रधानांचे सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले होते.
दोन्ही निवृत्त IAS अधिकाऱ्यांच्या नियुक्तीला कॅबिनेटच्या समितीची (Cabinet Committee) मंजुरी दिली होती. करारानुसार ही नियुक्ती दोन वर्षांची होती.
त्यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला असता.
परंतु त्यापूर्वीच अमरजित सिन्हा यांनी राजिनामा दिला आहे.
त्यांच्या राजीनाम्याचे कारण समजू शकले नाही.

 

Web Title : pm modis special advisor amarjeet sinha resigns

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Maharashtra Unlock | राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये रात्री 8 वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी, पुण्यासह 11 जिल्ह्यांत निर्बंध कायम

Maharashtra HSC Result | अखेर विद्यार्थ्यांची उत्सुकता संपली ; 12 वीचा निकाल उद्याच जाहीर होणार

Pune Crime Branch Police | जुन्या भांडणाच्या व उसने पैशाच्या कारणावरुन तरुणाचा सपासप वार करुन खून, 12 तासात 4 जणांना अटक