PM मोदी कडाडले काँग्रेसवर, विधेयकाबाबत म्हणाले – ‘शेतकर्‍यांनो यांच्या नादाला लागू नका, विरोधक खोटं बोलताहेत’

पाटणा : वृत्तसंस्था – बिहारमधील विधानसभा निवडणूकीच्या अगोदर केंद्र सरकारने अनेक योजना देण्यास सुरुवात केली आहे. याच अनुक्रमे शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मिथिलांचलला जोडणार्‍या कोसी रेल महासेतुचे उद्घाटन केले. या दरम्यान पंतप्रधान मोदींनी आपल्या संबोधनात सांगितले की, आज रेल्वे कनेक्टिव्हिटीच्या क्षेत्रात इतिहास रचला गेला. या प्रकल्पांचा बिहार तसेच पश्चिम बंगाल आणि पूर्व भारतातील लोकांना फायदा होईल.

शेतकरी विधेयकाबाबत काँग्रेसवर कडाडले मोदी
येथे पंतप्रधान म्हणाले की, काल लोकसभेत शेतकर्‍यांशी संबंधित विधेयक संमत झाले आहे, ज्यामुळे शेतकर्‍यांना बंधनातून मुक्ती मिळेल. पंतप्रधान म्हणाले की, आता शेतकर्‍यांना सूट मिळेल आणि मध्यस्थांकडून सुटका झाली आहे. ज्यांनी वर्षानुवर्षे देशावर राज्य केले आहे, आज तेच लोक या विधेयकाला विरोध करत आहेत आणि शेतकऱ्यांशी खोटे बोलत आहेत. पंतप्रधान म्हणाले की, ज्या लोकांनी सत्ता चालवली आणि त्याला आपल्या जाहीरनाम्यात समाविष्ट केले, आता त्याच गोष्टीवर राजकारण करत आहेत.

पंतप्रधान म्हणाले की, काही लोकांना हे आवडत नाही की शेतकऱ्यांना नवीन संधी मिळत आहे. एमएसपी बद्दल मोठ्या गोष्टी बोलल्या जात आहेत, परंतु कधी आपले वचन पूर्ण केले नाही.

पीएम मोदी म्हणाले की, एमएसपी मिळणार नसल्याचे खोटे बोलले जात आहे, सरकार धान्य खरेदी करणार नाही. हे खोटे आहे आणि शेतकऱ्यांची फसवणूक आहे. पंतप्रधानांनी हे स्पष्ट केले की, एमएसपीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना रास्त भाव मिळत राहील. पीएम मोदी म्हणाले की, नितीश कुमारही येथे आहेत आणि त्यांनी या विधेयकाला पाठिंबा दर्शवला आहे. नितीशजींनी हा कायदा बिहारमधून आधीच काढून टाकला होता, आता देश त्यालाच पुढे आणत आहे.

पंतप्रधान म्हणाले की, केंद्राच्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात एक लाख कोटी रुपये जमा केले गेले आहेत. बऱ्याच योजना पूर्ण केल्या गेल्या, सिंचनासाठी स्वतंत्र योजना आखली जात आहे. पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांना आवाहन करत सांगितले की, त्यांच्यात अडकू नका आणि सावध राहा. पंतप्रधान म्हणाले की, ते शेतकर्‍यांच्या बचावासाठी बोलत आहेत, परंतु ते मध्यस्थांना पाठिंबा देत आहेत.

लालू यादव यांच्यावर मोदींचा हल्ला
पीएम मोदींनी येथे आपल्या भाषणात सांगितले की, अटलजींचे सरकार गेल्यानंतर या प्रकल्पाची गती कमी झाली. जर दुसर्‍या सरकारला बिहारच्या लोकांची काळजी असती आणि जे लोक त्यावेळी तत्कालीन रेल्वेमंत्री होते त्यांना जर काळजी असती तर हे काम यापूर्वीच झाले असते. पण त्यांना असे करण्याची इच्छा नव्हती. ते म्हणाले की, जर दृढनिश्चय असेल आणि नितीश यांच्यासारखा साथीदार असेल तर सर्व काही शक्य आहे.

पंतप्रधान म्हणाले की ५-६ वर्षांत आम्ही समस्यांवर तोडगा काढला आहे. ४ वर्षांपूर्वी उत्तर-दक्षिण बिहारला जोडणारे दोन महासेतु सुरू केले. पंतप्रधान म्हणाले की, भूकंपाच्या आपत्तीने मिथिला आणि कोसी यांना वेगळे केले होते, आज कोरोना महामारीमध्ये या दोघांना पुन्हा एकत्र केले जात आहे. हा प्रकल्प अटल जी आणि नितीश बाबूंचा ड्रीम प्रोजेक्ट आहे.

या कार्यक्रमात नितीशकुमार म्हणाले की, अटल जी यांच्या कार्यकाळात याची सुरुवात झाली होती, पण युपीए सरकारच्या काळात संपूर्ण काम थांबले. आता तुम्ही आला आहात, त्यामुळे हे काम पूर्ण होऊ शकले. नितीश यांनी यावेळी आवाहन करत म्हटले की, या लाईनला आणखी वाढवले पाहिजे, अशी माझी सरकारकडून अपेक्षा आहे. मोदी म्हणाले की, आता ३०० किमी प्रवास करावा लागणार नाही, काहीच वेळात अंतर पार केले जाईल.

पंतप्रधानांनी आपल्या संबोधनात म्हटले की, आत्मनिर्भर भारत मोहिमेंतर्गत बिहारमधील रेल्वे नेटवर्कचा विस्तार आणि विद्युतीकरण केले जात आहे. ते म्हणाले की, २०१४ पूर्वीच्या पाच वर्षांत केवळ सव्वा तीन किमी रेल्वे मार्ग सुरू झाला, पण २०१४ नंतरच्या पाच वर्षांत ७०० किमी रेल्वे लाईन सुरू झाली आहे. अजूनही एक हजार किमी नवीन रेल्वे मार्ग तयार केला जात आहे.

याशिवाय मोदींनी समस्तीपूर रेल्वे विभागाच्या अनेक योजनांचे उद्घाटन केले आणि सुपौल येथून आसनपूर कुपहा डेमू ट्रेनचे कामकाजही मंजूर केले.

लिच्छवीसह दोन गाड्यांना मिळणार ग्रीन सिग्नल
मोदींनी समस्तीपूर रेल्वे विभागाच्या ५ मोठ्या योजनांसह ३ गाड्यांनाही ग्रीन सिग्नल देत रवाना केले. डीआरएम अशोक माहेश्वरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएम मोदींनी सीतामढी ते आनंद विहार टर्मिनलसाठी इलेक्ट्रिक इंजिन असलेली लिच्छवी एक्स्प्रेस, सुपौल सरायगढ आसनपुर कुपहा स्टेशनसाठी डेमू आणि सरायगढ राघोपूरसाठी एका डेमू ट्रेनला डिजिटल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ग्रीन सिग्नल देऊन रवाना केले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like