PM मोदी – आता आपल्या पायांवर उभे राहावेच लागेल, जनतेला लिहिलेल्या पत्रातील 8 महत्वाच्या गोष्टी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसर्‍या कार्यकाळाचे पहिले वर्ष आज पूर्ण होत आहे. या खास निमित्ताने पीएम मोदी यांनी देशातील जनतेला एक पत्र लिहिले आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, जर स्थिती सामान्य झाली तर मला तुमच्यात येऊन तुमचे दर्शन घेण्याचे सौभाग्य मिळेल, परंतु कोरोनामुळे जी स्थिती निर्माण झाली आहे त्यामध्ये, या पत्राद्वारे आपला आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे.

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या पत्रात पहिल्या कार्यकाळाचा उल्लेख केला आहे. त्यानंतर दुसर्‍या कार्यकाळातील पहिल्या वर्षातील कामाची माहिती दिली आहे. पंतप्रधान मोदी यांनी जनतेच्या नावाने पत्राद्वारे लोकांशी संवाद साधला आहे. या पत्रातील 8 महत्वाचे मुद्दे जाणून घेवूयात…

पीएम मोदींच्या पत्रातील खास गोष्टी

1. आजपासून एक वर्षापूर्वी भारतीय लोकशाहीच्या इतिहासात एक नवा सुवर्ण अध्याय जोडला. देशात दशकांनंतर पूर्ण बहुमताचे सरकार लागोपाठ दुसर्‍यांदा आले. हा अध्याय रचण्यात जनतेची मोठी भूमिका आहे. यामुळे आजचा हा दिवस माझ्यासाठी तुम्हाला नमन करण्याचा आहे.

2. 2014 मध्ये जनतेने देशात एका मोठ्या परिवर्तनासाठी मतदान केले होते, देशाची नीती आणि रीती बदलण्यासाठी मतदान केले होते. त्या पाच वर्षात देशाने व्यवस्था मुळापासून आणि भ्रष्टाचार दलदलीतून बाहेर काढताना पाहिला आहे.

3. 2019 मध्ये तुमचा आशीर्वाद देशाच्या मोठ्या स्वप्नांसाठी होता, आशा आणि आकांक्षांसाठी होता. या एक वर्षात घेण्यात आलेले निर्णय याच मोठ्या स्वप्नांचे उड्डाण आहे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास हा मंत्र घेऊन देश सामाजिक असो किंवा आर्थिक, जागतिक असो किंवा अंतर्गत, प्रत्येक दिशेने पुढे जात आहे.

4. मागील एक वर्षात काही खास निर्णय जास्त चर्चेत राहीले. यामुळे ते लक्षात राहणे स्वाभाविक आहे. कलम 370, राम मंदिर निर्माण, तीन तलाक असो की नागरिकत्व दुरूस्ती कायदा, ही सर्व कामे आठवतात.

5. लागोपाठ घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक बदल झाले. भारताच्या विकासाला नवी गती आणि लक्ष्य लाभले. लोकांच्या अपेक्षासुद्धा पूर्ण केल्या.

6. देशाच्या इतिहासात प्रथमच असे झाले की, जेव्हा शेतकरी, शेत मजूर, छोटे दुकानदार आणि असंघटीत क्षेत्रातील कामगार, सर्वांसाठी 60 वर्षांच्या वयानंतर 3 हजार रुपये नियमित मासिक पेन्शन सुविधा देण्यात आली.

7. सामान्य जनहिताशी संबंधीत कायदे बनले, यासाठी मागच्या वर्षात वेगाने काम झाले आणि मागचा विक्रम तोडला. याच कारणामुळे ग्राहक संरक्षण कायदा, चिटफंड कायद्यातील दुरूस्ती, दिव्यांग, महिला आणि मुलांची सुरक्षा देणारा कायदा, हे सर्व वगाने बनवण्यात आले.

8. आम्ही वेगाने पुढे जात होतो, तेवढ्यात कोरोना जागतिक महामारीने भारताला सुद्धा घेरले. अनेक लोकांनी शंका व्यक्ती केली होती की, जेव्हा कोरोना भारतावर हल्ला करेल तेव्हा भारत संपूर्ण जगासाठी संकट बनेल. परंतु, आज भारताकडे बघण्याची दृष्टी बदलली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like