PM Modi in Hooghly : पीएम नरेंद्र मोदी यांची पश्चिम बंगालमध्ये निवडणूक सभा, जाणून घ्या खास गोष्टी

कोलकाता : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी पश्चिम बंगालच्या दौर्‍यावर आहेत. पंतप्रधान मोदी यांनी बंगालच्या हुगलीमध्ये निवडणूक सभेला संबोधित केले. पश्चिम बंगालमध्ये आपाडा ते दक्षिणेश्वरपर्यंत मेट्रो रेल्वेच्या विस्ताराचे उद्घाटन करण्यासाठी पोहचलेल्या पीएम मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरूवात बांग्लामध्ये अभिनंदन करून केली. मोदी म्हणाले, तुमचा हा उत्साह, उर्जा कोलकातापासून दिल्लीपर्यंत एक मोठा संदेश देत आहे. आता पश्चिम बंगालने परिवर्तनाचा विचार केला आहे.

मोदींनी मागील सरकारांवर हल्ला करताना म्हटले की, आधुनिक हायवे, आधुनिक रेल्वे, आधुनिक एयरवे, काही देशाच्या आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चरने, या देशांना आधुनिक बनवण्यात मदत केली, तिथे हे परिवर्तनाचे एक मोठे कारण बनले. आपल्या देशात सुद्धा हे काम दशकांपूर्वी झाले पाहिजे होते. परंतु झाले नाही. पीएम मोदी यांनी म्हटले की, आपल्याला आणखी उशीर केला नाही पाहिजे. याच विचारासह देशात आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चरच्या निर्मितीवर अभूतपूर्व जोर दिला जात आहे, अभूतपूर्व गुंतवणूक केली जात आहे.

मोदींच्या भाषणातील महत्वाच्या गोष्टी…

* पीएम मोदी म्हणाले, मागच्यावेळी प. बंगालला गॅस कनेक्टिव्हिटीची, इन्फ्रास्ट्रक्चरची भेट देण्यासाठी आलो होतो, आज रेल्वे आणि मेट्रो कनेक्टिव्हिटी मजबूत करण्याचे महत्वाचे काम सुरू होत आहे.

* पूर्व डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरचा लाभ प. बंगालला होणार आहे. याचा भाग सुरू सुद्धा झाला आहे. लवकरच संपूर्ण कॉरिडोर खुला होईल.

* विशेष किसान रेल्वेचा लाभ आज पश्चिम बंगालच्या छोट्या शेतकर्‍यांना वेगाने मिळत आहे. नुकतीच 100वी किसान रेल्वे महाराष्ट्राच्या सांगलीहून पश्चिम बंगालच्या शालीमारपर्यंत चालवली गेली.

* पीएम मोदी म्हणाले की, मी हैराण आहे की इतक्या वर्षात जेवढी सरकारे येथे होती, त्यांनी या संपूर्ण प्रदेशाला आपल्याच स्थितीवर सोडून दिले. येथील इन्फ्रास्ट्रक्चर अस्थितर होऊ दिले. वंदे मातरम भवन जिथे बंकिमचंद जी 5 वर्ष राहिले, ते तर अतिशय वाईट स्थितीत आहे.

* येथील राजकारण बंगालच्या लोकांना दुर्गामातेची पूजा करण्यापासून रोखते. बंगालचे लोक, वोटबँकच्या राजकारणासाठी आपल्या संस्कृतीचा अपमान करणार्‍यांना माफ करणार नाहीत. बंगालमध्ये भाजपाचे सरकार आले तर प्रत्येकाला आपल्या संस्कृतीचा गौरव करता येईल. कोणतीही भिती असणार नाही.